दादा बाळू धुमाळ (वय २५, रा. रामोशी आळी, हडपसर गाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, हवालदार प्रताप गायकवाड, प्रदीप सोनवणे, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, समीर पांडुळे, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अविनाश गोसावी गुन्हे प्रतिबंधात्मक गस्तीवर होते.
त्या वेळी माहीतगार सूत्रांनी सांगितले की, रेकॉर्डवरील गुन्हेगार दादा धुमाळ हातात तलवार घेऊन मी या भागातील दादा आहे, अशी शेरेबाजी केलेल्याचा व्हीडिओ तयार करून व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर (रामोशी आळी) येथे सापळा रचून दादा काळे यास अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता लोखंडी तलवार, मोबाईल आणि एक मोटारसायकल जप्त केली. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.