जुन्नरला नगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:52 AM2018-10-28T00:52:31+5:302018-10-28T00:52:50+5:30

कारवाईविरोधात नागरिकांनी दाखल केला होता न्यायालयात दावा

Hammer on encroachment of Junnar municipality | जुन्नरला नगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

जुन्नरला नगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

googlenewsNext

जुन्नर : जुन्नर नगरपालिकेच्या वतीने कल्याणपेठ बोचरेआळी परिसरात शहरविकास आराखड्यानुसार रुंदीकरण करण्यात येत असलेल्या रस्त्यामध्ये येत असलेल्या संरक्षक भिंतीची अतिक्रमणे नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने काढून टाकली.

याबाबत अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण काढून टाकण्याच्या आदेशाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्याने या करवाईबाबत नागरिकांत उत्सुकता होती. जुन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणपेठेत, शहराच्या रस्ते विकास प्रक्रियेत अडथळा ठरणारी ही अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत रवींद्र चौधरी आणि सुषमा वाळिंबे यांना नगरपालिकेने यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या.

त्यांनी बंगल्याचे बांधकाम करताना संरक्षक भिंत रस्त्यावर अतिक्रमण करून बांधली होती. रस्त्याचे ९ मीटरचे रुंदीकरण करण्याचे नगरपालिकेचे नियोजन होते. तर विकास आराखड्यात बांधकाम करतेवेळी ६ मीटरचा रस्ता असल्याचे संबंधितांचे म्हणणे होते.
मुख्याधिकारी डॉ. काटकर यांच्यासह नगरपालिकेचे बांधकाम विभाग प्रमुख व्ही. एन. देशमुख, नगरसेवक भाऊ कुंभार, जुन्नरचे पोलीस निरीक्षक के. के. खराडे, विनय खत्री, हरी गायकवाड, अरुण मंचरकर तसेच अतिक्रमण विभाग पथक या वेळी उपस्थित होते.

याप्रकरणी मात्र संबंधितांनी अतिक्रमण काढून टाकण्याऐवजी नगरपालिकेच्या विरोधात जुन्नर न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना काही दिवसांचा स्थगिती आदेश दिला होता. त्यानंतर नगरपालिकेने कॅव्हेट दाखल केले होते. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्र न्यायालयाने त्यांना पुन्हा जुन्नर न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. मात्र शहर विकासाच्या प्रक्रियेत कोणाही नागरिकाला अडथळा करता येत नाही. शहर विकासाच्या महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमातील तरतुदींचा आधार घेऊन कायदेशीर प्रक्रियेने पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे जेसीबी लावून काढण्यात आली.

Web Title: Hammer on encroachment of Junnar municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.