दुर्घटनाग्रस्तांना पुणेकरांकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 03:31 AM2018-09-29T03:31:06+5:302018-09-29T03:31:28+5:30

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मुठा उजवा कालव्याची भिंत फुटली. त्यानंतर दांडेकर पूल सर्व्हे नंबर १३३ या दिशेने पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्यामध्ये अनेकांचे घर, संसार व दैनंदिन वस्तू वाहून गेल्या आहेत.

 The hand of the help from the victims of Pune incident | दुर्घटनाग्रस्तांना पुणेकरांकडून मदतीचा हात

दुर्घटनाग्रस्तांना पुणेकरांकडून मदतीचा हात

Next

पुणे - पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मुठा उजवा कालव्याची भिंत फुटली. त्यानंतर दांडेकर पूल सर्व्हे नंबर १३३ या दिशेने पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्यामध्ये अनेकांचे घर, संसार व दैनंदिन वस्तू वाहून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना मदतीसाठी पुणेकर, अनेक सामाजिक संस्था, स्थानिक नगरसेवक यांनी पुढाकार घेतला होता.
२७ सप्टेंबरला झालेल्या या हाहाकारामध्ये या परिसरातील नागरिकांना आपली घरे, घरातील टीव्ही, फ्रिज, दैनंदिन वस्तू गमवाव्या लागल्या. दुपारनंतर पाण्याचा प्रवाह थोडा फार कमी झाला. तेव्हा महानगरपालिका, संस्था, व त्या भागातील मंडळे यांनी मदत करण्यास सुरुवात केली. दांडेकर पूल परिसरातील स्थानिक नगरसेवक यांच्यातर्फे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली. शुक्रवारी दिवसभर सर्व नागरिकांची घरे, वस्तू व त्यांची अवस्था पाहणी करताना दिसून येत होते. परिसरातील काही घरांचे अर्धवटपणे नुकसान झाले होते. तर काही लोकं त्याच घरात बसून जेवण करताना दिसत होते. आपल्या घरातील पाणी, चिखल, स्वच्छ करण्यासाठी सर्व नागरिक एकमेकांना साहाय्य करत होते. ओढ्यातून दगड मातीच्या चिखलाचे प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येत होते. नगरसेवक धीरज घाटे यांच्याकडून नागरिकांना दोन वेळचे जेवण देण्यात आले. तसेच त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत थांबून साने गुरुजी शाळेत व बुद्ध विहारात त्यांची राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना नाष्टा, जेवण दिले.
धीरज घाटे म्हणाले, गुरुवारी ही अत्यंत वाईट दुर्घटना घडली. त्यादिवशी लोक फारच भावनिक झाली होते. परंतु आता थोडी विश्रांती मिळाल्याने शांत झाले आहेत.

स्थानिक नागरिकांची धावपळ
दांडेकर पूल परिसरात घराघरांत पाणी व पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा साठला होता. त्या भागात अनेक ठिकाणी चिखल झाला होता. महानगरपालिका कर्मचारी क्रेनच्या साहाय्याने गाळ बाहेर काढत होते. तसेच घराघरात जाऊन साठलेले पाणी कशाप्रकारे काढता येईल यासाठी प्रयत्न करत होते.

डीपी दुरुस्तीचे काम सुरू
अशा परिस्थितीत विजेचा काही धोका निर्माण होऊ नये म्हणून दुसºया दिवशी शुक्रवारी महावितरणकडून मीटर काढण्याचे काम चालू होते. पण ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले व पाणी शिरले आहे अशा नागरिकांची मीटर काढण्यात आले. तसेच परिसरातील डीपी दुरुस्तीचे काम चालू होते.

गणेश मंडळांचा पुढाकार
दांडेकर पूल परिसरात असणाºया अजिंक्य भीमज्योत सेवा संघ, विवेकानंद तरुण मंडळ, साने गुरुजी मंडळ या मंडळांनी पुढाकार घेऊन जेवण व राहण्याची सोय केली. या परिसरात असणाºया चार बुद्ध विहार, साने गुरुजी स्मारक याठिकाणी गुरुवारी रात्री झोपण्याची सोय करण्यात आली होती. लाईट आणि असोसिएशनच्या वतीने गुरुवारी रात्री लाईटची व्यवस्था करण्यात आली. दोन तीन दिवसांत हे काम पूर्ण होऊन सर्व काही सुरळीत होईल असे नगरपालिकेकडून सांगण्यात आले.

कपडे वाटप
शुक्रवारी वृंदावन कॉलनी येथील महिला बचत गट यांच्या वतीने कपडे वाटप करण्यात आले. तसेच अनेक पुणेकर आपल्या घरातून कपडे आणून देत होते. गिरीश महाजन यांनी पीडितांची भेट घेतली.

Web Title:  The hand of the help from the victims of Pune incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.