पुणे : राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत येण्याची व कामाची संधी मिळाल्याने खूप आनंदी आहे़. त्याबरोबरच ही खूप मोठी जबाबदारी असल्याची जाणीव आहे, असे मत पोलीस आयुक्त डॉ़. के़.व्यंकटेशम यांनी व्यक्त केले़ डॉ़. व्यंकटेशम यांनी रश्मी शुक्ला यांच्याकडून शुक्रवारी सायंकाळी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला़ त्यानंतर ते बोलत होते़. डॉ़. व्यंकटेशम म्हणाले, पुणे शहरात शुक्ला यांनी खूप चांगले उपक्रम राबवत उल्लेखनीय काम केले आहे़. त्यांनी सुरु केलेले सर्व उपक्रम यापुढेही चालू ठेवण्यात येणार आहे. पुण्यातील बडी कॉप उपक्रम मी नागपूरमध्ये राबविला़ त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे़. पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी मी सदैैव तत्पर असेल. तसेच गुन्हेगारांनी त्यांचा रस्ता सोडावा, असे माझे आवाहन आहे़.रश्मी शुक्ला म्हणाल्या, माझ्यासाठी आजचा दिवस संस्मरणीय आहे. कारण या समारंभाच्या निमित्ताने एक योगायोग जुळुन आला आहे़. व्यंकटेशम यांच्याकडून मी लॉ अँड आॅर्डरच्या पोलीस उपनिरीक्षक या पदाचा कार्यभार स्वीकारला होता़. आज पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतर डॉ़. व्यंकटेशम यांचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी स्वागत केले. तसेच रश्मी शुक्ला यांना नव्या पदासाठी शुभेच्छा दिल्या़.
सांस्कृतिक राजधानीत कामाची संधी मिळाल्याने आनंद : डॉ़. के़.व्यंकटेशम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 7:18 PM
पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी मी सदैैव तत्पर असेल : डॉ़. व्यंकटेशम
ठळक मुद्देपुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला