मातीशी नातं जाेडणारा पुण्यातील तंदूर चहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:22 PM2018-05-24T17:22:38+5:302018-05-24T21:22:26+5:30
पुण्यातील खराडी भागात अागळा वेगळा असा तंदूर चहा मिळताे. या चहाची चव चाखण्यासाठी लांबून लाेक या चहाच्या शाॅपला भेट देत अाहेत.
पुणे : अाजपर्यंत तंदूरच्या भट्टीमध्ये तयार केलेले अनेक पदार्थ तुम्ही चाखले असतील. तंदूर भट्टीतील मातीची चव त्या पदार्थ्यांना मिळत असल्याने अापल्याला ती हवीहवीशी वाटते. परंतु पुण्यातील खराडी भागात तंदूर चहा मिळताे असं जर तुम्हाला काेणी सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. एमस्सी झालेल्या दाेन तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा हाेता. या व्यवसायात अापल्या मातीचा कुठेतरी टच असावा असा त्यांनी विचार केला अाणि सुरु झाला तंदूर चहा
अमाेल राचदेव अाणि प्रमाेद बानकर यांनी खराडी भागात चायला हे चाय शाॅप सुरु केले अाहे. या चाय शाॅपची खासियत म्हणजे इथला तंदूर चहा. एका माेठ्या तंदुर मध्ये विशिष्ट प्रकारची मातीची मडकी गरम केली जातात. त्यानंतर तयार केलेला चहा त्यात अाेतला जाताे. त्यामुळे त्याला एक मातीचा सुगंध अाणि स्माेकी फ्लेवर येताे. त्यानंतर ताे वाफळता चहा एका विशिष्ट भांड्यात अाेतला जाताे अाणि एका मातीच्याच कुल्लडमध्ये ग्राहकांना सर्व केला जाताे. ही चहा तयार करण्याची पद्धत अनाेखी असल्याने येथे चहा प्यायला येणारे ग्राहक चहा तयार करण्याची पद्धतही अावर्जुन पाहत असतात.
अमाेल अाणि प्रमाेद हे उच्चशिक्षित तरुण अाहेत. पाच वर्षापूर्वी त्यांनी व्यावसाय करण्याचे ठरवले. सुरुवातील त्यांनी एका हाॅटेलमध्ये काम केले त्यानंतर अापल्या स्वतःचं काहीतरी असावं या हेतून त्यांनी चहाचं दुकान टाकायचे ठरवले. त्यांच्या अाज्जीकडून खरंतर त्यांना या तंदुर चहाची कल्पना सुचली. 18 मार्चला त्यांनी हा तंदूर चहा खराडीत सुरु केला अाणि पाहता पाहता ताे लाेकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पाेहचला. अमाेल अाणि प्रमाेद यांच्याकडे या चहाचे तसेच हा चहा तयार करण्याच पेटंड सुद्धा अाहे. भारतात फक्त या चायला शाॅपमध्येच हा तंदूर चहा मिळताे. या चहासाठी खास गावाकडून तयार केलेली मातीची मडकी वापरली जातात. ही मडकी एकदाच वापरली जातात. अाज पाहता पाहता दरदिवसाला 1200 ते 1500 ग्राहक या ठिकाणी तंदुरी चहाचा अास्वाद घेण्यासाठी येतात. ग्राहकांना अावडेल अशी रचनाही या शाॅपमध्ये करण्यात अाली अाहे. पुण्याच्या विविध भागातून खास हा तंदूर चहा पिण्यासाठी नागरिक गर्दी करत अाहेत.
लाेकमतशी बाेलताना अमाेल राचदेव म्हणाले, स्वतःचा व्यवसाय सुरु करायचे ठरवले तेव्हा अापल्या मातीतलं काहीतरी असावं असा अामचा विचार हाेता. त्यातही चहा हे नागरिकांचे अावडते पेय असल्याने चहाचे दुकान सुरु करण्याचे अाम्ही ठरवले. अामच्या अाज्जीकडून खरंतर अाम्हाला या तंदूर चहाची प्रेरणा मिळाली. सहा महिने या चहावर संशाेधन केल्यावर अाम्ही हा अागळा वेगळा तंदूर चहाचा शाेध लावला. पुणेकरांचा याला माेठा प्रतिसाद सध्या मिळत अाहे. लांबून नागरिक या चहाची चव चाखण्यासाठी अामच्या चायला शाॅपला भेट देत अाहेत.