चालकास अडवून औषधांचा टेम्पो पळवला
By admin | Published: December 22, 2016 01:38 AM2016-12-22T01:38:13+5:302016-12-22T01:38:13+5:30
चालकास अडवून मारहाण करून बांधून औषधांच्या बॉक्ससह टेम्पो पळवून नेल्याची घटना आज (दि. २१) दुपारी दीड वाजण्याच्या
इंदापूर : चालकास अडवून मारहाण करून बांधून औषधांच्या बॉक्ससह टेम्पो पळवून नेल्याची घटना आज (दि. २१) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काळेवाडी गावच्या हद्दीत घडली.औषधे, इतर वस्तू व टेम्पो असा ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेल्याच्या आरोपावरून तीन ते चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.टेम्पोचालक महंमद अहमद खान (वय २२, होलसिटी, किसमबाग, बहाद्दूरपुरा, नजबनगर, हैदराबाद) याने फिर्याद दिली आहे. ठाणे अंमलदार शंकरराव वाघमारे यांनी सांगितले, की फिर्यादी आपल्या ताब्यातील टेम्पोमध्ये (एपी २८/ टीसी ८४८३) भिवंडी येथील तळोजा एमआयडीसीमधून औषधाचे ५७९ बॉक्स, ६ पंखे असा माल भरून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबादकडे निघाला होता. काळेवाडी येथे आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रकमधील व्यक्तीने, फिर्यादीस थांबण्याचा इशारा केला. फिर्यादीने टेम्पो थांबवला. ट्रकच्या पाठीमागून आलेल्या ओपन जीपमधील अनोळखी तीन ते चार जणांनी टेम्पोमध्ये चढून फिर्यादी व त्याच्या सहकाऱ्यास बेदम मारहाण केली.