पुणे : राज्यात बराच काल प्रलंबित असणारी (health department) आरोग्य विभागाची पद भरती परीक्षा अखेर आता २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. प्रवेश पत्र प्राप्त झाल्यानंतर पसंतीचे केंद्र न मिळाल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी युवासेनेचे पदाधिकारी कल्पेश यादव (kalpesh yadav) यांच्याकडे केली होती. त्यानंतर यादव यांनी आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याशी चर्चा केली तसेच आरोग्य विभागाचे सह संचालक डॉ. आर. एस. देशमुख यांनी भेट घेतली.
यादव म्हणाले, विद्यार्थ्यांची अडचण सोडवणे हे माझं प्रथम प्राधान्य आहे. समाज माध्यमांवर उठणाऱ्या खोट्या अफवांच्या मुळे या परीक्षा रद्द होतात आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होते आहे. हेच पुन्हा होऊ नये म्हणून मी तातडीने डॉ. पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यानंतर डॉ. देशमुख यांची भेट घेतली. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रात अडचणी असतील त्यांच्यासाठी विशेष १० हेल्पलाईन नंबर ( helpline number) आज कार्यान्वित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या सुरू असणाऱ्या हेल्पलाईन क्रमांक तसेच मेल आयडी वर दोन विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदवली असून त्यावर तातडीने कार्यवाही करून अडचण दूर करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवेस बळी न पडता अभ्यास करावा. तसेच काही अडचण असल्यास थेट हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून आपल्या तक्रारींचे निवारण करावे. असे आवाहन देखील यादव यांनी यावेळी केले आहे.
हेल्पलाईन नंबर:-
परीक्षेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त
राज्यात यापूर्वी पद भरती परीक्षा होत असतांना समाजातील काही विघातक प्रवृत्तीकडून पेपर फुटी सारखे प्रकार घडतात. यातून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या तरुणांचे नाहक नुकसान होते. हेच लक्षात घेऊन आज युवसेनेच्या कल्पेश यादव यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाकडे पद भरती परीक्षा केंद्रावर अधिकचा बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे. याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना आरोग्य संचालनालयास पत्र ही देण्यात आले असल्याची माहिती यादव यांनी दिली.