ओतूर परिसरात तासभर जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:25+5:302021-07-14T04:13:25+5:30
सोयाबीन व भुईमूग या पिकांना जीवदान -- ओतूर : ओतूर विभागात गेले १५ दिवस दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले ...
सोयाबीन व भुईमूग या पिकांना जीवदान
--
ओतूर :
ओतूर विभागात गेले १५ दिवस दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते या विभागात प्रामुख्याने सोयाबीन व काही प्रमाणात भुईमूग हे पिक घेतले जाते. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्व मशागती करुन काहींनी पेरण्या केल्या होत्या सोयाबीन व भुईमूग या पिकांचा उतार होऊन पिके तरारून आली होती परंतु गेले १५ दिवस पावसाने दडी मारली कधी कडक उन कधी नुसतेच ढगाळ वातावरण होते पेरणीनंतर चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत होता. काही शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली. पिकांची उतरण झाली पण वाढीसाठी पावसाची आवश्यकता होती पण आज तासभर जोरदार पाऊस झाल्याने या विभागातील भुईमूग सोयाबीन या पिकांना जीवदान मिळाले असल्याचे उदायपूर येथे शेतकरी राहुल शिंदे, डोमेवाडीचे चैतन्य फार्मर क्लबचे सदस्य बबनराव भोरे यांनी सांगितले. टाँमेटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठल्यामुळे टाँमेटो उत्पादक शेतकऱ्यांच्या टाँमेटो पिकांचे पाणी साठल्यामुळे नुकसान झाले आहे असल्याची माहिती रोहोकडीचे शेतकरी पोपट घोलप यांनी दिली. हा पाऊस ओतूर परिसर डोमेवाडी उदापूर डिंगोरे आंबेगव्हाण पाचघर धोलवड रोहोकडी आदी ठिकठिकाणी झाल्याने बळीराजा सुखावला आहे
व