राज्य हिंदी नाट्यस्पर्धेमध्ये ‘हॅलो राधा मैं रेहाना’ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:52+5:302021-01-19T04:14:52+5:30
पुणे : ५९व्या राज्य हिंदी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर या संस्थेच्या ‘हॅलो राधा मैं ...
पुणे : ५९व्या राज्य हिंदी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर या संस्थेच्या ‘हॅलो राधा मैं रेहाना’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले, तर भगतसिंग युवक मंडळ, बेळगाव या संस्थेच्या ‘भूमिका’ या नाटकाला द्वितीय व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिंतामणनगर शाखेच्या ‘रूद्राली’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. ३ फेब्रुवारी, २०१९ ते ७ जानेवारी, २०२०दरम्यान भरत नाट्य मंदिर पुणे, सायंटिफिक सभागृह, नागपूर, डॉ.काशिनाथ घाणेकर (मिनी) नाट्यगृह, ठाणे आणि रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे आयोजित या स्पर्धेत एकूण ५७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घोषित करण्यात आला. स्पर्धेत स्वतंत्र कलाग्रुप संस्थेच्या ‘कबिरा खडा बाजार मैं’ या नाटकासाठी चतृर्थ तर स्नेहांकित मंडळ, औरंगाबाद या संस्थेच्या ’औरंगजेब’ या नाटकासाठी पाचवे पारितोषिक मिळाले. स्पर्धेचे परीक्षक सुहास भोळे, दिनेश श्रीवास्तव आणि कमल हवळे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *दिग्दर्शन : डॉ.जयश्री कापसे गावंड ( हॅलो राधा मैं रेहाना, प्रथम क्रमांक), दर्शन महाजन (भूमिका, द्वितीय), शफी नाईकवडी (रूद्राली, तृतीय)
*नाट्यलेखन: निरंजन मार्कंडेयवार ( हॅलो राधा मैं रेहाना, प्रथम), दर्शन महाजन (भूमिका, द्वितीय), डॉ.चंद्रकांत शिंदे (रूचिरम, तृतीय)
*नेपथ्य : पंकज नवघरे ( हॅलो राधा मैं रेहाना, प्रथम), रवींद्र गिरकर ( केस नं. ९९, द्वितीय), प्रशांत निगडे ( स्माइल फॉर सेल, प्रथम), दीपक नांदगावकर (काली, तृतीय)
*प्रकाश योजना: हेमंत गृहे (हॅलो राधा मैं रेहाना, प्रथम), दीपक नांदगावकर (काली, द्वितीय), कृणाल सरदेशपांडे (घुमंतू, तृतीय)
*रंगभूषा : मेघना शिंगरू ( हॅलो राधा मैं रेहाना, प्रथम), प्रसाद गद्रे ( रूद्राली, द्वितीय), सुनील मेस्त्री (अंधे जहॉ के अंधे रास्ते, तृतीय)
---------------------------------------------