लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदार संरक्षण योजना बुधवारी मंजूर केली आहे. या बाबत नियुक्त खंडपीठाने नमूद केले आहे की, साक्षीदारांना देण्यात येणा-या धमक्यांचे प्रकार करून त्या आधारे पोलिसांनी धमकी विश्लेषण अहवाल तयार करावा. साक्षीदाराला न्यायालयात आणण्यासाठी सरकारी वाहन द्यावे, साक्षीदारांना येणा-या फोन व मेलवर लक्ष ठेवावे, साक्षीदारांच्या घरी सीसीटीव्ही व अलार्म आदी बाबी बसवाव्यात, साक्षीदारांच्या जवळच्या व्यक्तीचा फोन नंबर बरोबर ठेवून त्याच्या घराजवळ पेट्रोलिंग करावे, अशा तरतुदी या योजनेत करण्यात आल्या आहेत. ही योजना ख-या आरोपींना शिक्षा सुनावणीसाठी अत्यंत प्रभावी आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेतला जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया वकिलांनी व्यक्त केल्या. साक्षीदारांच्या सुरक्षेच्या आणि खटल्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत चांगली आहे. मात्र त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. साक्षीदारांवर साक्ष देताना दबाव येवू नये यासाठी यापुर्वी देखील अनेक उपाययोजन करण्यात आल्या आहेत. या योजनेचा गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खात्रीशीर व्यक्तींचीच साक्ष घेतली जावी. त्यात पोलिसांची महत्त्वाची भूमिका असते.अॅड. विजयसिंह ठोंबरे ----साक्षीदार हे प्रत्येकवेळी प्रत्यक्षदर्शी नसतो. अनेकदा खुन्नशीपोटी किंवा जवळच्या व्यक्तींवर अन्याय झाला आहे, म्हणून साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली जाते. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर अनेकदा साक्षीदार फितूर होतात. खोट्या साक्षीमुळे निर्दोष व्यक्तीला शिक्षा दिली जावू शकते. त्यामुळे दोन्ही बाजुंचा विचार होणे गरजेचे आहे. अॅड. सचिन ठोंबरे ---खटल्याची पुर्ण जबाबदारी ही साक्षीदारांवर असते. समोर गुन्हा घडलेला असतो तरी साक्षीदार भीतीपोटी पुढे येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अशी योजना राबविल्यास साक्षीदारांच्या मनातील भिती नक्कीच दूर होईल. योग्य साक्षीदार पुढे आल्यास शिक्षेचे प्रमाण वाढून गुन्हेगारीला वचक बसेल. या सवार्मुळे सरकारी वकिलांना केस चालवणे अधिक सोपे होईल. अॅड. विवेक भरगुडे---आरोपी निर्दोष सुटण्यामागे साक्षीदारांनी साक्ष फिरवणे हे एक मुख्य कारण आहे. सबळ पुरावे नसतील तर आरोपीली शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे ही योजना मंजुर करून सर्वोच्च न्यायालयाने चांगले पाऊल उचलले आहे. याबाबत आणखी काही कायदे आहेत. मात्र त्यांची योग्य प्रकारे अमंलबजावणी होणे गरजेचे आहे.अॅड. तौसिफ शेख --- मोठ्या खटल्यात फिर्यादींना फितूर करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांना अशा प्रकारची सुविधा देणे गरेजेचे आहे. साक्षीदारांच्या बाबत अनेकदा गैरप्रकार देखील होतात. पैसे देवून साक्षीदार उभे केले जातात. त्यामुळे संबंधित केसचा निकाल आरोपींच्या विरोधात लागतो. खरे साक्षीदार असतील आणि आरोपीचा खरच काही रोल नसेल तर मीरीटवर सुटू शकतो. पण अशा वेळी पोलीस आणि साक्षीदार यांची भूमिका महत्त्वाची असते. अॅड. गायत्री कांबळे ---
साक्षीदारांच्या मनातील भीती दुर होण्यास मदत ; वकिलांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 5:32 PM
सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदार संरक्षण योजना बुधवारी मंजूर केली आहे.
ठळक मुद्देसाक्षीदार संरक्षण योजना मंजुरही योजना ख-या आरोपींना शिक्षा सुनावणीसाठी अत्यंत प्रभावी गैरफायदा घेतला जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे