पुणे : दाने दाने पर लिखा होता है खानेवाले का नाम असे म्हटले जाते. तुम्हीही खवैय्ये असाल आणि त्यातही पुण्यात असाल तर अभिनंदन, कारण तुम्ही आहात भारतातल्या खवैय्यांच्या शहरात. जिथे प्रत्येक कोपऱ्यावर तुम्हाला चवदार खायला मिळेल.त्यामुळे विविध चवींनी तुमची जिव्हा तर तृप्त होईलच पण जास्त प्रवास करण्याची गरज नाही.ही पुण्यातल्या पदार्थ आणि ते पदार्थ मिळणाऱ्या ठिकाणांची यादी
१ हॉटेल गुडलकचा बनमस्का , फर्ग्युसन रस्ता
२ मारझोरिन सॅन्डविच, एम जी रोड कॅम्प
३ रामनाथ मिसळ, टिळक रोड
४ आंबाबर्फी आणि बाकरवडी, चितळे बंधूंचे कोणतेही दुकान
५ बादशाहीची थाळी, टिळक रोड
६ शिवदीप वडापाव, कर्वेनगर
७ जर्मन बेकारी, कोरेगाव पार्क
८ मावा केक, कयानी बेकारी,कॅम्प
८ पॅटिस, संतोष बेकरी, आपटे रोड
९ इडली वडा सांबार, स्वीट होम, कुमठेकर रोड
१०असिंग्स बर्गर, लॉ कॉलेज रस्ता
११ कढई जिलेबी, बाणेर
१२ गिरीजा पाव भाजी, सदाशिव पेठ
१३ सुजाता मस्तानी, सदाशिव पेठ आणि इतर शाखा
१४ काटा किर्र मिसळ, कलमाडी शाळेजवळ, नळस्टॉप
१५ मलाई लस्सी, कलाकंद, पुणे स्टेशन समोर
१६ कल्याण भेळ, लॉ कॉलेज रोड आणि इतर शाखा
१७ खिचडी- काकडी आणि नाष्ट्याचे पदार्थ, कर्वे रोड
१८ सुप्रीम सॅन्डविच, आप्पा बळवंत चौक
१९ पंजाबी लस्सी, मान डेअरी, परिहार चौक औंध
२० गीता पावभाजी, निगडी
२१ राज मंदिर पेरू आईस्क्रीम, कोथरूड
२२ पूना कोल्ड्रिंक हाऊस, बुधवार पेठ
२३ भडंग भेळ, चिंचवड गाव बसस्टॉप
२४ अनारसे सामोसे, सदाशिव पेठ
२५ जोशी वडेवाले, शिवाजीनगर आणि इतर शाखा
भूक लागली असेल तर हे आहेत पुण्यातले टॉप २५ पदार्थ आणि त्यांचे पत्तेसुद्धा.. तेव्हा खा आणि तृप्त व्हा !