येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाइन हिंदी दिवस कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. रसाळ म्हणाले, हिंदी भाषेचा इतिहास प्राचीन आहे. आदिकालापासून आधुनिक काळापर्यंत साहित्य ग्रंथांमधून एक संपर्क भाषा म्हणून हिंदीचे महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी जर हिंदी भाषेचे कौशल्य आत्मसात केले, तर संवाद अथवा लेखन माध्यमातून जाहिरात क्षेत्रात वेगवेगळ्या संधी निर्माण होऊ शकतात. हिंदीचे क्षेत्र व्यापक होत चालले आहे.
हिंदी दिवसाच्या निमित्ताने काव्यवाचन आणि निबंध लेखन ऑनलाइन घेण्यात आले. यामध्ये गौरव खैरे या विद्यार्थ्याचा निबंध उल्लेखनीय ठरला. प्रास्ताविक प्रा. संगीता पवार यांनी केले. स्वागत प्रा. किशोरी ताकवले यांनी केले. डॉ. बेबी कोलते यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. हिंदी विभागाची विद्यार्थिनी हुमेरा पानसरे हिने आभार मानले.