इतिहासाच्या शिक्षकाने तपासला भूगोलाचा पेपर

By admin | Published: May 28, 2016 04:24 AM2016-05-28T04:24:42+5:302016-05-28T04:24:42+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील इतिहासाच्या शिक्षकाने चक्क भूगोलाची उत्तरपत्रिका तपासल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

History teacher examined Geography paper | इतिहासाच्या शिक्षकाने तपासला भूगोलाचा पेपर

इतिहासाच्या शिक्षकाने तपासला भूगोलाचा पेपर

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील इतिहासाच्या शिक्षकाने चक्क भूगोलाची उत्तरपत्रिका तपासल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाने या शिक्षकाला पुढील वर्षभर परीक्षेचे कोणत्याही प्रकारचे काम करण्यास मनाई केली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भोर तालुक्यातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे नसरापूर महाविद्यालयातील डॉ. रामकृष्ण ढेरे असे या शिक्षकाचे नाव आहे. ते इतिहास विषयाचे शिक्षक आहेत. आॅक्टोबर २०१४मध्ये द्वितीय वर्ष कला अभ्यासक्रमाच्या भूगोल या विषयाची उत्तरपत्रिका त्यांनी तपासल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षा मूल्यमापनात चुकीने काम केल्याचे निष्पन्न झाल्याने परीक्षा प्रमाद समितीच्या निर्णयानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यानुसार, त्यांना विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षेच्या कोणत्याही कामासाठी एक वर्ष मनाई करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात पुन्हा अशी चूक करू नये, अशी समजही ढेरे यांना देण्यात आली आहे. परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी परिपत्रक काढले आहे.

दहा दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेच्या उत्तरपत्रिका एका विद्यार्थिनीच्या घरात सापडल्याची बाब उघडकीस आली होती. त्यापूर्वी कोऱ्या उत्तरपत्रिका विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावर आढळल्या होत्या. आता हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परीक्षा मूल्यमापनाबाबत शिक्षकांकडून निष्काळजीपणे काम केले जाते, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Web Title: History teacher examined Geography paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.