शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

इतिहासाच्या शिक्षकाने तपासला भूगोलाचा पेपर

By admin | Published: May 28, 2016 4:24 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील इतिहासाच्या शिक्षकाने चक्क भूगोलाची उत्तरपत्रिका तपासल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील इतिहासाच्या शिक्षकाने चक्क भूगोलाची उत्तरपत्रिका तपासल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाने या शिक्षकाला पुढील वर्षभर परीक्षेचे कोणत्याही प्रकारचे काम करण्यास मनाई केली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भोर तालुक्यातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे नसरापूर महाविद्यालयातील डॉ. रामकृष्ण ढेरे असे या शिक्षकाचे नाव आहे. ते इतिहास विषयाचे शिक्षक आहेत. आॅक्टोबर २०१४मध्ये द्वितीय वर्ष कला अभ्यासक्रमाच्या भूगोल या विषयाची उत्तरपत्रिका त्यांनी तपासल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षा मूल्यमापनात चुकीने काम केल्याचे निष्पन्न झाल्याने परीक्षा प्रमाद समितीच्या निर्णयानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यानुसार, त्यांना विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षेच्या कोणत्याही कामासाठी एक वर्ष मनाई करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात पुन्हा अशी चूक करू नये, अशी समजही ढेरे यांना देण्यात आली आहे. परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी परिपत्रक काढले आहे.दहा दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेच्या उत्तरपत्रिका एका विद्यार्थिनीच्या घरात सापडल्याची बाब उघडकीस आली होती. त्यापूर्वी कोऱ्या उत्तरपत्रिका विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावर आढळल्या होत्या. आता हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परीक्षा मूल्यमापनाबाबत शिक्षकांकडून निष्काळजीपणे काम केले जाते, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.