साहसी शिबिरातील १४८ विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 09:50 PM2019-05-02T21:50:32+5:302019-05-02T21:54:29+5:30
राजगडाच्या पायथ्याशी शिवशौर्य संस्थेतर्फे आयोजित साहसी बालसंस्कार शिबिरातील एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांवर आग्या मोहळ मधमाशांनी हल्ला केल्याची गटना गुरूवारी (दि २) दुपारच्या सुमारास घडली. शिबिराच्या पहिल्याच दिवशी खेळतांना मधमाश्यांच्या पोळ्यांना चेंडु लागल्याने हा मोह उठल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
पुणे :राजगडाच्या पायथ्याशी शिवशौर्य संस्थेतर्फे आयोजित साहसी बालसंस्कार शिबिरातील एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांवर आग्या मोहळ मधमाशांनी हल्ला केल्याची गटना गुरूवारी (दि २) दुपारच्या सुमारास घडली. मथमाशांच्या हल्यानंतर गोंधळ उडला. अनेक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मधमाश्यांनी डंख मारल्याने विद्यार्थ्यांना उलट्या व मळमळ सुरु झाली. जखमी विद्यार्थ्यांना साखर येथील खाजगी दवाखान्यात व कंरजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी खेळतांना मधमाश्यांच्या पोळ्यांना चेंडु लागल्याने हा मोह उठल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
गुरूवारी दि.२ राजगडच्या पायथ्याला गुंजवणे गावात शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे संयोजन अमित थोपटे शिवशाही संघटना, मुकेश चव्हाण, विश्वजित पाटील, ऋशिकेष केदार, गजानन व्हावळ, आदींनी केले होते. यामध्ये नरसिंह हायस्कुल जुनी सांगवी पुणे व पैठण व गुंजवणे येथील स्थानिक मुले असे एकुण १४८ विद्यार्थी व शिक्षक संयोजक उपस्थित होते. दुपारी एक ते दिड वाजण्याच्या सुमारास मुलांना टी शर्टचे वाटप झाल्यानंतर अचानक मधमाश्यांचा थवा शिबिरातील विद्यार्थ्यांवर तुटुन पडला. अनेक विद्यार्थ्यांना मधमाश्यांनी डंख मारल्यानेन एकच गोंधळ उडाला. सगळे विद्यार्थी सैरभैर धावु लागले. अनेक विद्यार्थी एकमेकांना धडकुन पडले. काही विद्यार्थी जवळील असलेल्या घरांमधुन लपुन बसले तर काहींना पळता न आल्याने जाग्यावर असणा-या ताडपत्रीने स्वता:ला झाकुन ठेवले तरी मधमाशी त्या ताडपत्रीवर जावुन बसल्या. ऊन्हामुळे विद्यार्थ्यांना ताडपत्रीमुळे गरम होणार गुदमरणार तर वरती मधमाशांचा थवा यामुळे उपस्थितांना काय करावे सुचेना. सगळीकडे गोंधळ आरडा ओरडा रडारडी पळापळ झाली. सगळीकडे धुमाकुळ घालत मधमाश्या लाल टी शर्ट घातलेल्या विद्यार्थ्यांच्या मागे लागल्या होत्या. परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन गुंजवणेचे उपसरपंच दिलीप कोथमिरे, स्थानिक ग्रामस्थ तानाजी हारपुडे, दगडु घाटे, सतिश कडु, राजु किसन रसाळ, गोविंद रसाळ, बाळासाहेब शिळीमकर, यांनी मशाल पेटवत धुर करित ताडपत्रीवरील मधमाश्या हुसकवुन लावल्या.
हे करताना या स्थानिकांनाही मधमाश्या चावल्या. या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना घेवुन जवळील चिरमोडी गावात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक आरोग्य पथक दाखल झाले. परंतु यांचा पाठलाग करित माश्या तेथे आल्याने तेथुन साखर येथील खाजगी व दवाखान्यात व करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ नंबरच्या तीन गाड्या व खाजगी गाड्यांनी विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.आर.पी. नांदेडकर, वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.बॅनर्जी ,डॉ. काजल कोडीतकर, डॉ.किरण भालेराव,जितेंद्र भिलवडे यांनी ऊपचार केले. तर जास्त जखमी असलेल्या १४ जणांना प्राथमिक उपचार करुन तर सर्व विद्यार्थी व शिक्षकांची तपासनी करुन जखमींना सोडल्याची माहिती डॉ.आर.पी. नांदेडकर यांनी दिली.