या कार्यक्रमाप्रसंगी वालचंदनगर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूणार्कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला, वृक्षारोपण व कोरोना योद्धयांचा फेटा, शाल, श्रीफळ, देऊन सत्कार केला. आर के ग्रुपचे रविराज खरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ताई-दादा सप्ताहातंर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका युवकाध्यक्ष शुभम निंबाळकर व सिद्धार्थ चितारे यांनी प्रमाणपत्र वाटप केले.यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ, ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम उपाध्यक्ष मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण वीर, राहुल रणमोडे, प्रवीण बल्लाळ, सिद्धार्थ चितारे, पिनू झेंडे, अतुल सावंत, माऊली मेटकरी,आणि कोरोना योद्धे-डॉ.निलेश हेगडेवार, डॉ. अतुल कांबळे,मुरलीधर चिंचकर, सुवर्णा पेंढारकर, शहांनब्बी मुज्जावर,स्मिता कुंभार, वैशाली शिवशरण,ज्योती मिसाळ,वैशाली पवार, सारिका राजमाने,अरुणा वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
———————————————
फोटो ओळी : वालचंदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात वृक्षारोपण करीत कोरोना योद्धयांना सन्मानित करण्यात आले.
१४०७२०२१-बारामती-०८
————————————————