गरळ ओकणाऱ्यांना गुरुजी कसे म्हणायचे? अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 12:50 AM2018-07-29T00:50:59+5:302018-07-29T00:51:11+5:30
माझ्या झाडाचे आंबे खा, मुले होतील. मनू संतांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी गरळ ओकणा-यांना गुरुजी तरी कसे म्हणायचे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. अशा मनुवाद्यांचा प्रतिकार एकजुटीने करायला हवा, असेही ते म्हणाले.
पुणे : माझ्या झाडाचे आंबे खा, मुले होतील. मनू संतांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी गरळ ओकणा-यांना गुरुजी तरी कसे म्हणायचे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. अशा मनुवाद्यांचा प्रतिकार एकजुटीने करायला हवा, असेही ते म्हणाले.
पवार म्हणाले, देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली. त्याच आडनावाशी साम्य सांगणारी एक व्यक्ती आज महिलांना पुन्हा चूल व मूल या क्षेत्रात पाठवू पाहते आहे. फुले दाम्पत्याला विरोध करणा-या प्रवृत्ती आजही अशा मधूनच डोके वर काढत असतात. त्यांचा प्रतिकार एकजुटीने करायला हवा. महिला व पुरुषांमध्ये भेद केला जातो ते देश मागासलेलेच राहतात. त्यांना सन्मान दिला जातो हे काहींना पाहवत नाही व ते असे बरळत असतात.