(स्टार ९२५ डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दीड वषार्च्या काळात केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या भावात २४० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भाग असो शहरी भाग. गृहिणींना घर संसार चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच भर म्हणून पूवी जी सबसिडी मिळत होती. ती मागील दीड वषार्पासून केंद्र सरकारने बंद केली आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे.
गेल्या वषर्भरात कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, त्यातच दर महिन्याला गॅॅस सिलिंडरच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. अद्यापही कोरोना पूर्णपणे गेला नाही, उलट काेराेना पाश्वभूमीवर शहरात अनेक निर्बध लागू केले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना देखील अडचणी येत आहेत. शहरात तर चूलही पेटवता येत नसल्याने गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
----
शहरात चूलही पेटवता येत नाही
१) कोरोनामुळे माझ्या पतीची नोकरी गेली आहे. सध्या रोजंदारीवर मिळेल ते काम करत आहेत. त्यामुळे किराणा खर्च आणि गॅस सिलिंडर यातच सर्व पैसे खर्च होत आहेत. ग्रामीण भागात लाकडं असल्याने चूल पेटवता येते. त्यामुळे एक वेळेस गॅॅस घेतला नाही तरी चालतो. मात्र, शहरात गॅॅस शिवाय पयार्रय नाही, जागा कमी असल्याने शहरात गॅॅस पेटवता येत नाही.
- मनिषा थोरात, गृहिणी
--
२) कोरोनामुळे अनेकांचे नोकऱ्या, रोजगार गेले आहेत. त्यामुळे लोकांकडे पैसे नाहीत. सातत्याने वाढणाऱ्या गॅॅस सिलिंडरच्या भाव वाढीमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने गॅॅस सिलिंडरचे भाव कमी करायला हवे.
- सुनिता कदम, गृहिणी
----
असे वाढत गेले घरगुती गॅसचे दर
महिना-वर्ष-दर
ऑगस्ट -२०२० - ५९४
सप्टेंबर- २०२० - ५९४
ऑक्टोबर -२०२० - ५९७
नोव्हेंबर -२०२० - ५९७
डिसेंबर- २०२० - ६९७
----------
महिना-वर्ष-दर
जानेवारी -२०२१ - ६९७
फेब्रुवारी- २०२१ - ७७२
मार्च -२०२१ - ८२२
एप्रिल- २०२१ - ८१२
मे -२०२१ - ८१२
जून -२०२१ - ८१२
जुलै -२०२१ - ८३७