पुणे : शतावरीच्या रोपांची लागवड करण्यापासून ते विक्रीकरेपर्यंतच्या बाबत देशभरातील शेकडो शेतकऱ्यांसह करार करुन कराराप्रमाणे एकरी पन्नास हजार रुपयांनी शतावरीचे पिक विकत घेऊनही त्याचे पैसे एकाही शेतकऱ्याला दिले नाहीत. ज्याना चेक दिला त्यांचा चेकही बाऊन्स झाला. तर अनेक शेतकऱ्यांचे पिक घेतलेच नाही त्यामुळे देशभरातील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सुमारे कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा आरोप करत राज्यभरातील व कर्नाटकातील ६० शेतकरी आज पुण्यात येऊन कंपनीच्या मालकाच्या घरासमोर ठिय्या मांडून बसले होते.
पुण्यात आलेल्या या सर्व शेतकऱ्यांनी पोलिस आयक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेला तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शुन्य हर्बल ॲग्रो डेव्हलपर्स यांनी आयुर्वेदीक वनस्पतीची लागवड व काढणी पश्च्यात त्याच्या मुळ्या हमीभावाने खरेदी रण्याची हमी देऊन महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, तेलंगणा, येथील सहाशे शेतकऱ्यांना आठशे एकर क्षेत्रावरी प्रतीएकर ५० हजार रुपयांप्रमाणे रोपांचे घेऊन रोपे दिली व दीड वर्षांनी त्या रोपांच्या मुळ्या ५० रुप प्रती किलो दराने खरदेी करण्याबाबत करारनामा केला. मात्र दीड वर्षानंतर त्यांनी काही शेतकऱ्यांच्या मुळ्या काढणी करून नेल्या त्याचे पैसे मात्र दिलेच नाहीत. तर काहींच्या मुळ्या दोन वर्षापासून खरेदीच केल्या नाहीत त्यामुळे ज्यांच्या खरेदी केल्या त्यांना पेमेंट साठी सातत्याने पाठपुरावा केल्यावर मात्र त्यांनी काही शेतकऱ्यांना चेक दिला मात्र तो बॅंकेत वठला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शुन्य हर्बल ॲग्रोचे ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
--
आज शेतकरी पुण्यात दाखल
--
चार-पाच राज्यातील शेतकऱ्यांनी या कंपनीशी करार करून ५०-५० एकरात शतावरीची लागवड केली मात्र दोन वर्षानंतर त्यापोटी एक रुपयाही त्यांनी दिला नाही अशे सुमारे साठ शेतकरी आज पुण्यात आले. त्यातील कर्नाटक, विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी तब्बल रात्रभर प्रवास करून पुणे गाठले. मात्र कंपनीचे कार्यालय ज्या ठिकाणी होते तेथे सध्या हॅास्पीटल उभे राहिले आहे व तेथे कंपनीची चौकशी करू नये असा फलक लावला आहे. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी पाटणकर यांच्या धायरी येथील निवससस्थानी गेले मात्र तेेथे ऋषिकेश पाटणकर यांच्या मातोश्री व पत्नी होत्या. त्यांच्याकडून निरोप मिळाला की दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिस आयुक्तालयात जाऊन त्यांच्यावर फसवणुकीबद्दल तक्रार दिली.
---