विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:38+5:302021-02-05T05:00:38+5:30
पुणे : लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणावरुन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त ...
पुणे : लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणावरुन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दीपक नामदेव काकडे (रा. पुणे) आणि विमलाबाई काकडे (रा. नांदेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रीती दीपक काकडे (वय ३२, रा. भुसारी कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. दीपक काकडे आणि प्रिती यांचा २०११ मध्ये विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणावरुन दीपक भांडणे करून मारहाण करीत. शारीरिक व मानसिक त्रास देत होता. तो प्रीतीशी संबंध न ठेवता बाहेरख्यालीपणा करीत होता. तिला मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळून प्रीती २९ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.