पुणे : कॉन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशनच्या (आयसीएसई) दहावी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये पुण्यातील सेंट मेरी स्कूलच्य हरगुन कौर मथारू या विद्यार्थींनीने ९९.८० टक्के गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय कानपुरच्या शेलिंग हाऊस स्कूलच्या अनिका गुप्ता तर बलरामपुरच्या जीसस एंड मेरी स्कूलच्या पुष्कर त्रिपाठी याने तृतीत क्रमांक मिळवला आहे.
आयसीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल ९९.९७ टक्के लागला असून गतवर्षी २०२१ ला ९९. ९८ टक्के निकाल लागला होता. यावर्षी परीक्षेस दोन लाख ३१ हजार ६३ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. उत्तीर्ण होण्याचे मुलींचे प्रमाण ९९.९८ टक्के असून मुलांचे प्रमाण ९९. ९७ टक्के आहे.
कोरोना महामारीमुळे आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा यावेळी दोन सेमीस्टरमध्ये घेण्यात आली. पहिली सेमीस्टर डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत झाली तर दुसरी सेमिस्टर २५ एप्रिल ते २३ मे २०२२ दरम्यान देशातील विविध केंद्रांवर झाली. यामध्ये यामध्ये पुण्यातील सेंट मेरी स्कूलच्य हरगुन कौर मथारू या विद्यार्थींनीने ९९.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
द्वितीय कानपुरच्या शेलिंग हाऊस स्कूलच्या अनिका गुप्ता ९९.८० टक्के, तृतीय बलरामपुरच्या जीसस एंड मेरी स्कूलच्या पुष्कर त्रिपाठी ९९.८० टक्के तर लखनऊच्या सिंटी मोंटेसरी स्कूलच्या कनिष्का मित्तलने ९९.८० टक्के मिळवत चतुर्थ क्रमांक मिळवला आहे. दरम्यान, जे विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या सेमिस्टरला उपस्थित राहिले नाहीत त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला नाही.