विचार भारती संमेलन पुण्यात
By admin | Published: May 10, 2017 04:19 AM2017-05-10T04:19:53+5:302017-05-10T04:19:53+5:30
भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवार दि. २१ मे रोजी विचार भारती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून,
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवार दि. २१ मे रोजी विचार भारती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून, आचार्य गोविंददेव गिरीमहाराज यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. सातारा रस्त्यावरील शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात हा एकदिवसीय सोहळा रंगणार आहे.
सकाळी साडेनऊला संमेलनास सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी साडेअकराला ‘व्यक्ती, समाज आणि साहित्य-परस्पर संबंध’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात प्रा. प्रभाकर पुजारी, प्रा. जयंत कुलकर्णी, शेफाली वैद्य हे विचार मांडतील. माध्यम अभ्यासक डॉ. विश्वास मेहेंदळे परिसंवादाचे अध्यक्ष असतील.
दुपारी २ वाजता गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये ‘मातृभाषेतून मन:शांती’ या विषयावर बोलतील. ज्येष्ठ शास्त्रज्ञ माधव गाडगीळ ‘मराठी विकिपिडीया : एक लोक चळवळ आणि भाषा समृद्धीचे दालन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी ५ वाजता विश्वास गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली निवडक निमंत्रित कवींचे संमेलन होणार आहे.
प्राच्यविद्यासंशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेसहा वाजता संमेलनाचा समारोप होईल, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत आणि संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार यांनी दिली.