लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा असे थेट वक्तव्य छत्रपती उदयनराजे भोसलेंनी केले आहे. देशाची फाळणी करायची आहे का असा सवाल उपस्थित करतानाच राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
पुण्यात आज औंध मध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजेंची भेट झाली.त्यानंतर उदयनराजे भोसले पत्रकारांशी बोलत होते.
" व्यक्तिगत स्वार्थासाठी कधी दुफळी निर्माण होईल असे काही कृत्य केलं नाही. आंदोलन वगैरे काय होणार ? आरक्षण द्यायचं असतं तर ते मागेच दिलं असतं. राजकारणी व्यक्तीकेंद्रित झाले आहेत . उद्रेक झाला तर आम्ही काही करू शकणार नाही. भूतकाळाचा विचार करायला पाहिजे. हे का झालं? व्ही पी सिंग मंडळ आयोगाचा वेळी लोकांनी भोसकाभोसकी सुरू केली होती. इश्यू बेस्ड पॉलिटिक्स करा. निवडून यायचं असल्याने त्यांना त्या समाजाचा फायदा करून देतात.लोकशाहीतले राजे नीट वागत नसले तर त्यांना आडवा आणि गाडा ना! माझ्या पासून सुरुवात करा. मला प्रश्न विचारा" असे उदयनराजे भोसले म्हणाले.
दरम्यान संभाजीराजेंचा आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या भूमिकेबाबत विचारल्यावर तसेच पंतप्रधानांना भेटणार का असं विचारल्यावर उदयनराजे भोसले म्हणाले," कोण काय बोलतं?प्रत्येकाचे विचार एक सारखे असावे अशी अपेक्षा करणे चुकीचे.गायकवाड कमिशन चा अहवाल यांनी वाचलाच नाही.पक्ष यात आणू नका. हे सगळ्या पक्षांना लागू होतं.इथे प्रश्न समजाचा आहे. आरक्षण प्रश्न ही राज्याची जबाबदारी. सभागृहात एक बोलतात आणि बाहेर वेगळं. विशेष अधिवेशन होऊ द्या ना.मग बघू"