पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेनंतर संपूर्ण राज्यच कामाला लागले आहे. त्यांचा ३ तारखेचा अल्टिमेटम त्यानंतर ४ तारखेचे आंदोलन याचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांनी जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाआरती, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे, अशी आंदोलने कार्यकर्त्यांनी सुरु ठेवली आहेत. तसेच काही भागात त्यांच्याकसून पोलिसांना निवेदनही दिले जात आहे. मुंबई पोलिसांनी या पार्श्वभूमीवर आवाजाबाबत नियमावलीचे पत्र काढले आहे. पुणे पोलिसांनी सुद्धा आवाजाबाबत नियमावलीचे पत्र काढावे अशी मागणी पुण्यातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आज सकाळी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
''भोंग्याच्या वादावरून मुबंई पोलीस आयुक्त यांनी आवाजाबाबत जे पत्र काढले आहे. तसेच पत्र पुणे पोलीस आयुक्तांनी काढावे. यामध्ये आवाजाची नियमावली दिलेली आहे. अनेक लोकांचे याबाबत फोन करत आहेत. जर पोलिसांनी याबाबत माहिती नाही दिली तर आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.''
पुणे पोलीस १० दिवसात माहिती देणार मनसे पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यावर त्यांनी १० दिवसात माहिती देतो असे ते म्हणाले. त्यानंतर आम्ही पुढील भूमिका जाहीर करू असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.