पुणे : ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. मात्र, रायगडावर कोण आहेत हो? आंदोलन हे नेहमी लोकांमध्ये करावं. पण खासदारकी संपता संपता हे सगळे कसे आठवायला लागले. मला त्यांचा मुद्दा पटला तर मी जाईन. ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही. जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कोणी नेता होत नाही अशा शब्दात भाजप नेते नारायण राणे यांनी खासदार संभाजीराजेंवर निशाणा साधला.
पुण्यात नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राणे म्हणाले, आंदोलन हे नेहमी लोकांमध्ये करावं. पण खासदारकी संपता संपता हे सगळे एकदम कसे आठवायला लागले. मला त्यांचा मुद्दा पटला तर मी जाईन. पण जनतेला वाटले पाहिजे की ते आपले राजे आहेत.
राणे यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचावर टीका करताना राणे म्हणाले"मुख्यमंत्र्यांचा अभ्यास कुठे आहे हो ? ते साधा एक प्रस्ताव वाचू शकत नाहीत.तेवढा वेळ मिळाला नाही. ते उद्गार काढतात का ? मी इतके वर्ष त्यांचा बरोबर होतो ते कधी उद्गार काढताना दिसले नाहीत." कोरोनावरून देखील त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली."मुख्यमंत्र्यांना घरचा बाहेर येत नाही. आणि सगळं केंद्राने द्यावं असं म्हणत बसायचं. लस मिळाली नाही त्याला दोघे जबाबदार. पण राज्य सरकार ने प्रयत्न करायला पाहिजे. ग्लोबल टेंडर काढले. आणि त्याला १२% मागितले.त्या नंतर टेंडर रद्द झाले. " असं ते म्हणाले.
काँग्रेस नेते नाना पटोलेंना राणेंचा इशारा.... दरम्यान काँग्रेसवर आणि नाना पटोले यांचावर देखील त्यांनी टीका केली." नाना पटोले यांना तोडफोड करायची काड्या करायची सवय आहे. ते पक्ष जोडणार नाहीत तर तोडणारे आहेत.तसेच पटोलेंनी पंतप्रधानांवर परत टीका केली तर नाना... आम्ही वाजवून टाकू... भजन " असं राणे म्हणाले.