...तर ‘सीरम’मधील अनर्थ टळला असता; ‘व्हेंटिलेशन’ची सोय नसल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:42 AM2021-01-23T00:42:32+5:302021-01-23T06:46:14+5:30

आग लागल्याचे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३३ मिनिटांनी कळविण्यात आले. तर, पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३५ मिनिटांनी ही माहिती समजली.

If ventilation facility were Available The disaster in ‘Serum’ would have been avoided | ...तर ‘सीरम’मधील अनर्थ टळला असता; ‘व्हेंटिलेशन’ची सोय नसल्याचे उघड

...तर ‘सीरम’मधील अनर्थ टळला असता; ‘व्हेंटिलेशन’ची सोय नसल्याचे उघड

Next

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीची घटना वेळेत अग्निशामक दलाला कळविण्यात आली असती, तर कदाचित पुढील अनर्थ टाळता आला असता. ही घटना कळविण्यात उशीर झाला असण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

आग लागल्याचे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३३ मिनिटांनी कळविण्यात आले. तर, पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३५ मिनिटांनी ही माहिती समजली. दोन्ही दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत उत्तम दर्जाची ‘फायर फायटिंग सिस्टीम’ आहे. आग लागली तेव्हा ही सिस्टीम सुरूही झाली होती. परंतु, आगीचे प्रमाण अधिक असल्याने आग या सिस्टीमद्वारे आटोक्यात आणणे अवघड झाले असावे. याच सिस्टीममधील पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, आग लागल्यानंतर आठच मिनिटांत अग्निशामक दलाला कळविल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे

घातपात की अपघात? आत्ता भाष्य नकोच : मुख्यमंत्री
ही आग म्हणजे अपघात होता, की घातपात यावर आत्ता भाष्य नको. तपास पूर्ण होऊ द्या, अहवाल येऊ द्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत शुक्रवारी ‘सीरम’ला भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढायला नको. मृत्यू झालेल्यांची संपूर्ण जबाबदारी ‘सीरम’ने घेतली आहे. आवश्यकता पडल्यास सरकारही मदत करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्फोट कशाचे झाले?
आग लागल्यानंतर स्फोटाचे आवाज आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, स्फोट नेमके कशाचे झाले हेच समजत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: If ventilation facility were Available The disaster in ‘Serum’ would have been avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.