सामंजस्याची भूमिका घेतल्यास विकासकामांना वेग, रायवाडी मळ्याकडे जाणारा रस्ता झाला रुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:14 AM2021-07-14T04:14:51+5:302021-07-14T04:14:51+5:30
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रायवाडी मळ्याकडे जाणारा रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे रायवाडी, तरवडी, पांढरी, शेवाळेवस्ती, माळीमळा, ...
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रायवाडी मळ्याकडे जाणारा रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे रायवाडी, तरवडी, पांढरी, शेवाळेवस्ती, माळीमळा, वडाळेवस्ती परिसरातील नागरिकांना जाता येताना त्रास होत होता. सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच ज्योती काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व संबंधित नागरिकांची बैठक घेऊन या बाबतीत चर्चा केली होती. या चर्चेत संबंधित अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करायला नागरिकांनी मान्यता दिली. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. या नागरिकांनी रस्ता रुंदीकरणास मान्यता दिल्यामुळे संबंधित नागरिकांचे सरपंच राजाराम काळभोर यांनी ग्रामपंचायतींच्या वतीने आभार मानले.
यावेळी हवेली पंचायत समितीचे सदस्य युगंधर काळभोर, माजी सरपंच भोलेनाथ शेलार, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, ग्रामपंचायत सदस्य योगेश काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, गणेश कांबळे, ग्रामविकास अधिकारी डी. के. पवार, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक आनंदा काळभोर, युवराज काळभोर, अमित काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.