तत्काळ तक्रार केल्याने मिळाली सर्व ३ लाखांची रक्कम परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:20+5:302021-07-14T04:13:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणाच्या खात्यातून ३ लाख ७ हजार रुपये सायबर चोरट्यांनी काढून घेतले होते. ...

Immediate complaint and return of Rs. 3 lakhs | तत्काळ तक्रार केल्याने मिळाली सर्व ३ लाखांची रक्कम परत

तत्काळ तक्रार केल्याने मिळाली सर्व ३ लाखांची रक्कम परत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणाच्या खात्यातून ३ लाख ७ हजार रुपये सायबर चोरट्यांनी काढून घेतले होते. या तरुणाने तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करुन ही रक्कम गोठविली व त्याच्या खात्यातून गेलेली ३ लाख ७ हजार २१७ रुपये परत मिळवून दिले.

फिर्यादी तरुणाला सायबर चोरट्यांनी दुबईतील जुलेखा हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एक ऑनलाईन फार्म भरायला सांगितला. त्यानंतर फिर्यादीला रजिस्ट्रेशन फी म्हणून १० रुपये भरावे लागतील, असे सांगून मोबाईलवर एक लिंक पाठविली. ही लिंक ओपन केली. त्यानंतर त्यांना एनीडेस्क व एस. एम. एस. फऑरवर्डर हे दोन ॲप डाऊनलोड करण्यास सांंगितले. त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर १० रुपये रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर त्यांच्या डेबिट कार्डद्वारे ३ लाख ७ हजार २१४ रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ते तातडीने सायबर पोलीस ठाण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मिळालेल्या माहितीवरून वेगवेगळ्या २ पेमेंट मर्चंटशी पत्रव्यवहार करून पेमेंट नोडल ऑफिसरशी संपर्क साधून फिर्यादीचे अकाऊंटवरून झालेले फ्राॅड ट्रान्झॅक्शन थांबविण्यास सांगितले. त्यामुळे पेमेंट मर्चंटने हे व्यवहार थांबवून ते पैसे पुन्हा फिर्यादीच्या खात्यात वळविले. त्यामुळे फिर्यादी तरुणाला गेलेले सर्व पैसे परत मिळाले.

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहायक निरीक्षक गणेश पवार, उमा पालवे, पूजा मांदळे यांनी ही कामगिरी केली.

.......

कोणत्याही प्रकारे कोणाची फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. कोणाच्या सांगण्यावरून मोबाईल क्लोन ॲप डाऊन लोड करू नका. कोणत्याही अनधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करु नका. तसेच मोबाईलवर आलेला ओटीपी, क्रेडिट - डेबिट कार्डचे नंबर कोणालाही शेअर करु नका, असे सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे.

फसवणूक झाल्यास तातडीने ७०५८७१९३७१/ ७०५८७१९३७५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Immediate complaint and return of Rs. 3 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.