हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:02 AM2021-06-12T04:02:02+5:302021-06-12T04:02:02+5:30

उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक संजय हांडे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, निमगाव (ता. खेड) येथील तांबे वस्तीवर ...

Impressions are gained in a fluid, global, diffused way | हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा

हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा

Next

उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक संजय हांडे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, निमगाव (ता. खेड) येथील तांबे वस्तीवर भीमा नदीकाठालगत हातभट्टी दारू काढली जात असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन एका शेतकऱ्याच्या शेतात तयार करण्यात येत आहे. त्यानुसार विभागीय उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त प्रसाद सुर्वे, जिल्हा उत्पादन शुल्क आयुक्त संतोष झगडे, उपायुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. गावठी दारू तयार करण्यासाठी लागणार कच्चा रसायनाची भट्टी जेसीबीच्या साहाय्याने फोडण्यात आली. सुमारे १४ हजार लिटर रसायन २ लाख ६७ हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले. साधन सामग्रीची तोडफोड करून नष्ट केले.

निमागावच्या तांबे वस्ती परिसरात भीमा नदीच्या काठावर शेताच्या कडेला व झाडाझुडुपांमध्ये हा अड्डा होता. पोलिसांनी भल्या सकाळी जाऊन त्याचा शोध घेतला. वरवर काहीच जाणवत नव्हते. केवळ उग्र वास येत होता आणि जवळच दारू बनवण्यासाठी भट्टी असल्याने पोलिसांनी ठावठिकाणा लावला. विहिरीप्रमाणे दोन खड्डे तयार करून त्यात मेणकागद टाकून त्यावर दारू, गूळ, नवसागर आणि इतर असे दारू बनवण्यासाठी असणारे कच्चे रसायन एकत्रितपणे साठवण्यात आले होते. पोलिसांनी हातभट्टीची दारू तयार करणारा चिराग दौलतराव राठोड (वय २८, रा. पठारवाडी चाकण, ता. खेड) याना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या कारवाईत उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक अधिकारी संजय हांडे, अरुण ताकले, विजय घंडुरे, मनोहरे केंगाळ, निमगावचे माजी उपसरपंच संतोष शिंदे, नवनाथ तांबे यांनी सहभाग घेतला.

फोटो ओळ : उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निमगाव (ता. खेड) येथे छापा टाकून हातभट्टी दारूचे कच्चे रसायन जेसीबीच्या साहाय्याने नष्ट केले आहे.

Web Title: Impressions are gained in a fluid, global, diffused way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.