शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

आरोग्याच्या दक्षतेबाबत महिलांमध्ये अनास्था

By admin | Published: May 28, 2016 4:23 AM

शहरातील महिला आहाराविष़यी जागृत आहेत. परंतु, कौटुंबिक जबाबदारीत व्यस्त राहिल्याने त्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे व्यायाम, सकाळी चालणे यांमध्ये

- किरण माळी,  पिंपरीशहरातील महिला आहाराविष़यी जागृत आहेत. परंतु, कौटुंबिक जबाबदारीत व्यस्त राहिल्याने त्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे व्यायाम, सकाळी चालणे यांमध्ये नियमितता नाही. आपल्या घराप्रमाणे परिसर स्वच्छतेविषयी जागरूक नाहीत. उच्चशिक्षित असूनही शारीरिक तक्रारी व आजाराकडे ६० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांचे दुर्लक्ष आहे. नियमित आरोग्य तपासणीविषयी महिलांमध्ये अनास्था आहे. जागतिक महिला आरोग्य दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांतील साधारणत ५० ते ६० महिलांच्या आरोग्याबाबत ‘लोकमत’तर्फे सर्वेक्षण करण्यात आले. उद्योगनगरीत अनेक महिला नोकरी करणा-या आहेत. रोजच्या धावपळीच्या काळात नोकरदार महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.महिलांच्या आहाराविषयक जागरूकता, सहज व सोपे व्यायामप्रकार, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, नियमित आरोग्य तपासणी, तसेच आरोग्यविषयक समस्या यांबाबत माहिती घेण्यात आली. या वेळी महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असून, आरोग्य जपण्याच्या दृष्टीने महिलांमध्ये अनास्था असल्याचे निदर्शनास आले आहे. आहाराविषयी महिला किती जागरूक आहेत, यासंबंधी माहिती घेतली.या वेळी सुमारे ५२ टक्के महिला आरोग्याच्या दृष्टीने सकस आहाराबाबत अनभिज्ञ आहेत. उर्वरित ४८ टक्के महिलांनी सकारात्मक उत्तरे दिली. त्यातून किमान आरोग्याच्या बाबतीत चौकस आहार, तसेच जेवण तयार करण्याच्या पद्धतीत बदल केल्याचे सांगितले.व्यायाम व चालणे या संदर्भात महिलांचे मत जाणून घेतले असता ७२ टक्के महिला व्यायाम करीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, व्यायामामध्ये अनियमितता आहे. व्यायाम करणा-या महिलांमध्ये २० टक्के योगासने, १२ टक्के जीममध्ये जात असल्याचे आढळले.सकाळी किंवा संध्याकाळी बागेत चालणाऱ्या महिलांचे प्रमाण ४० टक्के असल्याचे दिसून आले. जवळपासच्या महिला एकत्र येऊन चालण्याकडे महिलावर्गाचा कल असल्याचे दिसून आले. यामध्ये सुमारे २८ टक्के महिला या ना त्या कारणाने कोणताच व्यायामप्रकार करत नसल्याचे आढळले. घरगुती कामे तसेच व्यस्त दिनचर्या यांमुळे वेळच नसल्याचे प्रमुख कारण महिलांनी ‘लोकमत’ सर्व्हेक्षणावेळी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्वच्छतागृह, तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध होणे हा ऐरणीचा विषय असल्याने याबाबत मते घेतली असता ६४ टक्के स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह, तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. ३६ टक्के महिलांनी कामाच्या ठिकाणी किंवा मोठ्या संस्थांमध्येच सुविधा असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध असतील, तेथे पुरेशी स्वच्छता नसते. तेथील वातावरण सुरक्षित नसते. त्यामुळे स्वत:च सार्वजनिक ठिकाणचे स्वच्छतागृह वापरण्याचे टाळत असल्याचे महिला सांगतात. महिलांमधील विविध आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी विचारले असता रक्ताक्षयाचे प्रमाण महिलांमध्ये लक्षणीय आहे. त्यानंतर रक्तदाब, मधुमेह, तसेच थायरॉईडसारख्या समस्या महिलांमध्ये आहेत. मुळात काहीच आरोग्य समस्या नाहीत, शारीरिक व्याधी नाहीत, त्यामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)स्वत:च्या आरोग्याबाबत ‘ती’उदासीन कुटुंबाचा आधारस्तंभ असलेली स्त्री तिच्या आरोग्याच्या बाबतीत उदासीन असल्याचे वास्तव आहे. कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक बांधणी असलेली उत्कृष्ट दिनचर्या अभावानेच आहे, असे वास्तव आहे. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत, कौटुंबिक स्वास्थ्य जपणारी ‘ती’ स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत उदासीन आहे.- आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यात वेळ मिळत नसल्याची सबब- सार्वजनिक स्वच्छतागृहांबाबत कुचंबणा- रक्ताक्षयाचे प्रमाण लक्षणीय - नियमित आरोग्य तपासणी करण्याकडे दुर्लक्ष