रोटरी क्लब ऑफ मंचरचा पदग्रहण समारंभ एकलहरे येथे पार पडला. या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, रोटरीच्या प्रांतपाल मंजू फडके, उपप्रांतपाल संदीप बागडे, माजी सरपंच दत्ता गांजाळे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रश्मी समदडिया, नेत्रा शहा, बाळासाहेब कानडे आदी उपस्थित होते. अविनाश ढोबळे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे अरुण चिखले यांनी स्वीकारली. सचिवपदाची सूत्रे सचिन चिखले यांच्याकडून आदिनाथ थोरात यांनी स्वीकारली. खजिनदारपदी भूषण खेडकर यांची निवड करण्यात आली आहे. येत्या वर्षात मंचर शहरात घनकचरा व्यवस्थापन, खर्डीनाला विस्तारीकरण व सफाई, हॅप्पी व्हिलेज,डेंटल चेकअप कॅम्प, ई लर्निंग सर्वे, हॅपी स्कूल,हिमोग्लोबिन चेकअप कॅम्प, घरोघरी परसबाग निर्माण,गणपती विसर्जन वेळी निर्माल्य गोळा करणे असे उपक्रम राबविणार असल्याची माहिती अध्यक्ष अरुण चिखले यांनी दिली.
या वेळी रोटरी क्लबमध्ये डॉ. शिवाजी थिटे, निखिल शेलोत, राजेश इंदोरे, दीपक चौरे, प्रशांत बागल, शैलेश दगडे, अश्विनी काजळे, मनीषा चिखले, सीमा चिखले, आसावरी ढोबळे, अर्चना थोरात यांनी क्लबचे सदस्यत्व स्वीकारले. नवीन सदस्यांचे स्वागत शितल शहा यांनी केले.
रोटरी क्लबचे नूतन पदाधिकारी
अध्यक्ष :अरुण चिखले, सचिव : आदिनाथ थोरात, खजिनदार: भूषण खेडकर, उपाध्यक्ष :तुषार कराळे,क्ट अविनाश ढोबळे, क्लब अॅडमिन : बाळासाहेब पोखरकर,फाउंडेशन डायरेक्टर: ॲड. बाळासाहेब पोखरकर,सर्विस प्रोजेक्ट; सागर काजळे, डॉ. राजेश पाटील, डॉ. सचिन गाडे,डॉ. अरुण मांढरे, क्लब ट्रेनर सचिन काजळे,डायरेक्टर सीएसआर :बाळकृष्ण इंदोरे, बुलेटीन :डॉ. रवी दाते,जनार्दन मेंगडे, सचिन चिखले, दीपक भेकें, सल्लागार :डॉ. मोहन साळी, डॉ. सतीश गुजराती, शांताराम घुले,मारुती घुले याप्रमाणे आहे
यावेळी कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल माजी सरपंच दत्ता गांजाळे व त्यांचे सहकारी यांना रोटरी सर्विस एक्सेलन्स ह्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन आशिष पुंगलिया यांनी केले. प्रास्ताविक जनार्दन मेंगडे यांनी केले.
: कोरोनाकाळात केलेल्या कामाबद्दल माजी सरपंच दत्ता गांजाळे व सहकारी यांना पुरस्कार देण्यात आला.