क्रांतीस्तंभावर आदिवासी क्रांतिकारकाच्या नावाचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:47+5:302021-01-20T04:13:47+5:30

-- डिंभे : आंबेगाव पंचायत समिती आवरतील क्रांतीस्तंभावर आदिवासी क्रांतिकारकच्या नावाचा समावेश करा, पंचायत समिती आंबेगाव आवारात असणाऱ्या क्रांतिस्तंभावर ...

Include the name of the tribal revolutionary on the pillar of revolution | क्रांतीस्तंभावर आदिवासी क्रांतिकारकाच्या नावाचा समावेश करा

क्रांतीस्तंभावर आदिवासी क्रांतिकारकाच्या नावाचा समावेश करा

googlenewsNext

--

डिंभे : आंबेगाव पंचायत समिती आवरतील क्रांतीस्तंभावर आदिवासी क्रांतिकारकच्या नावाचा समावेश करा,

पंचायत समिती आंबेगाव आवारात असणाऱ्या क्रांतिस्तंभावर क्रांतिकारकांच्या नावांमध्ये आदिवासी आद्यक्रांतिकारक लायन हार्टेड होण्या भागू केंगले यांच्या नावाचा समावेश करा या मागणीचे निवेदन बिरसा ब्रिगेड आंबेगाव आणि आदिवासी क्रांती संघटना दोन्ही संघटनांनी सभापती संजय गवारी यांना दिले.

२०१६ पासून या मागाण्यांचा पाठपुरावा सुरु आहे.

मात्र २०१६ ला प्रस्ताव सादर करूनही आजपर्यंत त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्याअनुषंगाने बिरसा ब्रिग्रेड या संघटनेने सभापती संजय गवारी यांची भेट घेऊन त्याबाबतीत चर्चा केली होती. नवीन पंचायत समिती समोर सुरु असणाऱ्या क्रांतिस्तंभावर होनाजी केंगले यांच्या नावाचा समावेश व्हावा यासाठी १७ जानेवारी रोजी संघटनेने जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी जोपर्यंत होण्या केंगले यांच्या नावावरच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी निर्णय देत नाहीत तोपर्यंत नवीन क्रांतिस्तंभाचे उदघाट्न करू नये अन्यथा २५ जानेवारीला बिरसा ब्रिगेड आंबेगाव पंचायत समितीसमोर उपोषणास बसेल असा इशारा दीला होता.त्याबाबत सभापती संजय गवारी यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशी आज दुपारी एकच्या सुमारास चर्चा झाली. यावेळी जोपर्यन्त होण्या केंगले यांच्या क्रांतिस्तंभावरील नावाबाबत जोपर्यंत जिल्हाधिकारी निर्णय देत नाहीत तोपर्यन्त नवीन क्रांतिस्तंभाचे उदघाट्न केले जाणार नसल्याचे लेखी निवेदन गटविकास अधिकारी यांनी धील्याने २५ जानेवारी रोजी घोषित केलेले उपोषण मागे घेत असल्याची माहिती अध्यक्ष आदिनाथ हिले यांनी दिली.

या बैठकी वेळी तालुक्यातील बिरसा ब्रिगेडचे अनेक शिलेदार उपस्थित होते.

होनाजी भागूजी केंगले या वीराने बंडाचे निशाण इ. स.१८७४ मध्ये फडकवले. जुलमी सावकारशाही आणि इंग्रजी करप्रणाली याबाबत प्रखर लढा या ढाण्या वाघाने दिला. त्यांना पकडण्यासाठी तेव्हा इंग्रजांनी १ हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.१८७६ मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा होऊन सह्याद्रीमधील हे वादळ थांबवण्याचा प्रयत्न केला.

--

फोटो, : १९ डिंभे आदिवासी संघटना निवेदन

फोटो ओळी : आंबेगाव पंचायत समिती आवरातीला क्रांतीस्तंभवर आदिवासी क्रांतिकारकचे नाव घेण्यासाठीच्या मागणीचे निवेदन सादर करताना संघटनेचे पदाधिकारी.

Web Title: Include the name of the tribal revolutionary on the pillar of revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.