पिंपरी : आकुर्डी परिसरात राहणाऱ्या एका आयकर अधिकाऱ्याने आजाराला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आला. बबलू कुमार चंद्रेश्वर प्रसाद (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांना त्याने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे कारण नमूद केले आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू कुमार हे आईसह आकुर्डी येथे राहत होते. दोन वर्षापूर्वी आजारामुळे त्यांचा एक पाय कापावा लागला. तेव्हापासून ते तणावात होते. आजारपणामुळे एक पाय कापावा लागल्याने त्यांनी विवाह केला नव्हता. आजारपणात एक पाय गमवावा लागला. त्यामुळे कायम ते नैराश्येच्या गर्तेत होते. चांगली नोकरी असूनही आजारपणामुळे काहीच करता येत नाही. अपंगत्वाचे जीवन वाट्याला आले. अशी त्यांच्या मनात खंत होती. कार्यालयातही त्यांना वरिष्ठांची कार्यक्षमतेबद्दल बोलणी ऐकावी लागत होती. अशी चर्चा आहे. नैराश्येच्या गर्तेत गेल्याने त्यांनी आत्महत्या केली. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला असावा, असा पोलिसांनी अंदाज व्यकत केला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
आजारपणाला कंटाळून आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:25 PM
आकुर्डी परिसरात राहणाऱ्या एका आयकर अधिकाऱ्याने आजाराला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आला.
ठळक मुद्देकार्यालयातही त्यांना वरिष्ठांची कार्यक्षमतेबद्दल बोलणी