सोमवारी १९४ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:54+5:302021-02-16T04:11:54+5:30
पुणे : शहरात सोमवारी १९३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १६९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ३७६ ...
पुणे : शहरात सोमवारी १९३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १६९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ३७६ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्हची टक्केवारी आज ८.११ टक्के इतकी आहे. गेल्या पाच दिवसांत प्रथमच कोरोनाबाधितांचा आकडा २०० च्या आत आला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये १५१ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, २५२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १ हजार ६८३ इतकी आहे़ आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, यातील २ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ८०१ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ७४ हजार १९१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९५ हजार १८७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ८८ हजार ७०३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================