पुणे : शहरात शनिवारी २३७ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. ४७७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ८४४ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६़ १६ टक्के इतकी आहे़
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये २५७ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहे. यापैकी १६५ जण व्हेंटिलेटरवर आहेत़, तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ६३० इतकी आहे़
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ३ हजार ४६ वर आली आहे. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६४० इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख २५ हजार १७९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ७९ हजार ३०८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७१ हजार ६२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़