पुणे : शहरात रविवारी ३५४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, आठ दिवसांतील ही सर्वाधिक वाढ आहे़ आज २४८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात ३ हजार ५०८ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही १०़०९ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये १४५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २४८ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्णसंख्या १ हजार ६६१ इतकी आहेत. आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, १ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७९९ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ७१ हजार ८१५ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९४ हजार ९९४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८८ हजार ५३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================