पुणे : कोरोनावाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असले तरी, अद्याप त्याचे गांभीर्य नागरिकांना आलेले नाही़ याचाच परिणाम की काय शहरात दिवसागणिक नव्या कोरोनाबाधितांची वाढ होत असून, शुक्रवारी ५२७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे़
आज दिवसभरात ४ हजार २५४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत आजचा पॉझिटिव्हिटी रेट १२़ ३८ टक्के इतका आहे़ कालच्या तुलनेत तो दोन टक्क्यांनी अधिक वाढला आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्याºकोरोनाबाधितांची संख्या ३२५ वर गेली असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही १५९ इतकी झाली आहे़ दरम्यान सक्रियरूग्ण संख्याही आता वाढू लागली असून, ही संख्या २ हजार ३९९ इतकी झाली आहे़ आज दिवसभरात २८० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़
शहरात आजपर्यंत १० लाख ८९ हजार ७९३ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९६ हजार ९१६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८९ हजार ७०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८१६ जणांचा मृत्यू झाला आहे़
======================