काकडी, हिरवी मिरची, मटार, गवारच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:10 AM2021-03-15T04:10:37+5:302021-03-15T04:10:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असली तरी मागणी वाढल्याने ...

Increase in prices of cucumber, green chillies, peas, guar | काकडी, हिरवी मिरची, मटार, गवारच्या दरात वाढ

काकडी, हिरवी मिरची, मटार, गवारच्या दरात वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असली तरी मागणी वाढल्याने काकडी, हिरवी मिरची, मटार आणि गवारच्या दरात वाढ झाली. तर फ्लॉवर, शेवगा आणि कैरीच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती आडते असोसिएशन अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. १४) ९० ते १०० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून ४ ते ५ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो शेवगा, गुजरात आणि आंध्र प्रदेशातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून तोतापुरी कैरी ७ ते ८ टेम्पो, राजस्थान आणि पंजाबमधून मटार ४ ते ५ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून १० ते १२ ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ४० ते ४५ ट्रक इतकी आवक झाली आहे. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १४०० ते १५०० गोणी, कोबी सुमारे ४ ते ५ टेम्पो, प्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, मटार २०० गोणी, भुईमूग शेंग ४० ते ५० गोणी, गावरान कैरी २ टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक इतकी आवक झाली.

--

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा १२-१७ २०-२५

बटाटा ०८-१३ १५-३०

टोमॅटो ०५-१० १५-२५

भेंडी २५-३० ३०-४०

गवार ४०-६० ५०-७०

मिरची ३०-५० ४५-६०

कोथींबीर ०७-१० १०-१५

मेथी ०३-०७ १०-१५

मटार ३५-४० ४०-५०

गाजर १०-१४ १५-२०

--

कोथींबीर, चाकवत, अंबाडी, मुळे, चवळई आणि पालकचे दर वाढले

मार्केटयार्डात रविवारी कोथींबीर, चाकवत, अंबाडी, मुळे,

चवळई आणि पालकच्या दरात वाढ झाली असून, मेथी आणि राजगिऱ्याच्या दरात घट झाली. तर शेपू, कांदापात, पुदीना, चुका आणि हरभरा गड्डीचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी मार्केटयार्डात कोथिंबिरीच्या दीड लाख ३० हजार जुड्यांची,मेथीची ८० हजार जुड्यांची आवक झाली़

कोथिंबीर आणि मुळ्याच्या भावात घाऊक बाजारात प्रत्येकी दोन रुपयांची, चवळईच्या भावात तीन रुपयांची तर चाकवत, अंबाडी आणि पालकच्या दरात प्रत्येकी एक रुपयांची वाढ झाली आहे. तर मेथीच्या दरात एक रुपयाची तर राजगिऱ्याच्या दरात तीन रुपयांची गड्डीमागे घट झाली.

Web Title: Increase in prices of cucumber, green chillies, peas, guar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.