पुणे विभागात एसटीच्या उत्पन्नात वाढ; शिवशाहीमुळे वाढले उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:55 PM2018-01-22T14:55:10+5:302018-01-22T14:56:57+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या उत्पन्नात मागीलवर्षी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये तोट्यात असलेल्या पुणे विभागाला २०१७ मध्ये सुमारे २० लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला आहे. 

Increase in ST income in Pune division; Generation of income due to Shivsahi | पुणे विभागात एसटीच्या उत्पन्नात वाढ; शिवशाहीमुळे वाढले उत्पन्न

पुणे विभागात एसटीच्या उत्पन्नात वाढ; शिवशाहीमुळे वाढले उत्पन्न

Next
ठळक मुद्दे२०१६ मध्ये पुणे विभागाला मिळाले होते सुमारे ३५ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्नपुणे विभागाला २०१७ मध्ये सुमारे २० लाख २५ हजार रुपयांचा नफा

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या उत्पन्नात मागीलवर्षी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये तोट्यात असलेल्या पुणे विभागाला २०१७ मध्ये सुमारे २० लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला आहे. 
विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१७ मध्ये विभागामार्फत सोमवती अमावस्या, दत्तजयंती, उत्सव व यात्रा कालावधी तसेच ख्रिसमस सुट््यांमध्ये जादा वाहतुक करण्यात आली. याला मिळालेल्या प्रवासांच्या प्रतिसादामुळे उत्पन्नात भर पडली आहे. तसेच पुणे-कोल्हापुर, पुणे-नाशिक, पुणे-पणजी, पुणे-शिर्डी, पुणे-तुळजापुर, पुणे-दापोली, पुणे-चिपळूण अशा विविध मार्गावरील शिवशाही बसेसच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. 
२०१६ मध्ये पुणे विभागाला सुमारे ३५ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, त्याहून अधिक खर्च झाल्याने यावर्षी सुमारे २७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तर २०१७ मध्ये विभागाच्या उत्पन्नात किंचित वाढ होऊन ते सुमारे ३६ कोटी आठ लाख रुपयांपर्यंत पोहचले. तसेच मागील वर्षी खर्च कमी करण्यातही विभागाला यश आले. त्यामुळे हा खर्च ३५ कोटी ८८ लाखांपर्यंत खाली आला. परिणामी एसटीला २० लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला आहे. शिवाजीनगर आगार सर्वाधिक यशस्वी ठरले असून या आगाराला मागील वर्षी १ कोटी ३६ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. त्याखालोखाल स्वारगेट व बारामती आगाराला अनुक्रमे ४५ लाख ६६ हजार आणि २२ लाख ९१ हजार रुपयांचा नफा मिळाला. 

एसटीच्या पुणे विभागाची दोन वर्षांची स्थिती
वर्ष        २०१६            २०१७
किलोमीटर    १,०३,३२,०००        १,००,२३,०००
उत्पन्न        ३५,९७,१६,०००        ३६,०८,५१,०००
खर्च        ३६,७४,३४,०००        ३५,८८,२६,०००
नफा/तोटा    २७,१८,००० (तोटा)        २०,२५,००० (नफा)


प्रमुख आगारांचा निव्वळ नफा
आगार                     नफा
शिवाजीनगर    १,३५,९८,०००
स्वारगेट        ४५,६६,०००
बारामती    २२,९१,०००

Web Title: Increase in ST income in Pune division; Generation of income due to Shivsahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.