पिंपरी: शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी, सर्वाधिक रुग्ण हे लक्षणविरहित आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेले आहेत. त्यामुळे शहरातील सर्वाधिक रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.
सध्या शहरात ८७९७ रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी ६९११ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. तर १८८६ रुग्ण हे शहरातील रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्णांचे प्रमाण कमी आहे. गृहविलगीकरणात कोणते नियम पाळावे याची माहिती आता नागरिकांना झाली आहे. सुरुवातीला लक्षणविरहित आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना देखील कोविड केअर सेंटर मध्ये ठेवले जात होते. त्यामुळे अनेक रुग्णांना भरती जागा मिळत नव्हती. परंतु आता सर्वाधिक रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याने ज्या रुग्णांना घरी उपचार घेणे शक्य नाही. अशा रुग्णांना कोविड सेंटर मध्ये जागा मिळत आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर वॉच ठेण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. असा रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी दिले आहेत. त्याचबरोबर रुग्ण संख्येची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. एक रुग्ण आढळल्यास साधारण दहा व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. गंभीर रुग्णांसाठी नवीन जिजामाता आणि नवीन भोसरी रुगणालय येथे अतिदक्षता विभाग सुरू करण्याचे देखील काम सुरू असल्याची महिती आहे.
नोव्हेंबर मध्ये शहरातील कोरोना रुगणाची संख्या कमी झाली होती. त्यामुळे शहरातून कोरोना संपला अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु फेब्रुवारी पासून रुग्ण संख्या अचानक वाढली. रोज होणारी वाढ लक्षात घेता महापालिकेने उपयोजना सूरु केल्या आहेत. शहरातील बंद असलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. शहरातील विना मास्क फिरणाऱ्यावर जोरात कारवाई सूरु आहे. कोरोना तपासण्या वढविण्यात आल्या आहेत. सध्या महापालिकेच्या आठही रुगणल्यात कोरोना तपासण्या सुरू आहेत.
महापालकितेत पन्नास टक्केच कर्मचाऱ्यांना उपस्थिती राहण्याचे आदेश दिले आहेत. रात्री दहानंतर संचार बंदी करण्यात येत आहे. नागरिकांनी विना कारण गर्दी करू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तरुण वयोगटाला सर्वाधिक लागण त्यामुळे धोका कमी
कोरोनाची सर्वाधिकी लागण ही २२ ते ३९ या तरुण वयोगटाला झाली आहे. त्यामुळे ही गृहविलगीकरणात वाढ झाली आहे. तसेच तरुण वयोगटातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखता येईल असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
................................................................................................................................................................
गृहविलगीकरणात कोणते नियम पाळायचे याची नागरिकांना माहीती आता झाली आहे. रुग्ण वाढ होत असली, तरी लक्षणविरहित आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्ण जास्त आहे. त्या तुलनेत गंभीर रुग्णांचे प्रमाण सध्या कमी आहे. रुग्ण लक्षात घेता उपाय योजना करणे सुरू आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य, वैद्यकीय अधिकारी महापालिका