पाच दशकानंतर लढाऊ विमानाद्वारे पाकिस्तानवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 09:36 PM2019-02-26T21:36:19+5:302019-02-26T21:36:40+5:30

१९७१ च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी गेल्या पाच दशकानंतर पहिल्यांदा बॉम्ब हल्ले केले. सुखोई पाठोपाठ भारतीय हवाई दलातील प्रमुख स्ट्राईक विमानांपैकी एक असलेल्या मिराज २०००   विमाने ही शत्रुच्या रडार पासून दुर राहत लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

India attacks on Pakistan by using fighter aircraft after 50 years | पाच दशकानंतर लढाऊ विमानाद्वारे पाकिस्तानवर हल्ला

पाच दशकानंतर लढाऊ विमानाद्वारे पाकिस्तानवर हल्ला

Next

पुणे : १९७१ च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी गेल्या पाच दशकानंतर पहिल्यांदा बॉम्ब हल्ले केले. सुखोई पाठोपाठ भारतीय हवाई दलातील प्रमुख स्ट्राईक विमानांपैकी एक असलेल्या मिराज २०००   विमाने ही शत्रुच्या रडार पासून दुर राहत लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ही विमाने फ्रान्सच्या दसाल्ट कंपनीने बनविली असून विमानाच्या या कौशल्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हल्ले करण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात आला. 

                   मिराज २००० हे मल्टी रोल स्ट्राईक लढाऊ विमाने आहेत. गेल्या ३० वर्षाच्या काळात ५८३ मिराज विमाने वनविण्यात आले आहेत. १९९९ च्या कारगील युद्धात मिराज विमानांनी आपली क्षमता या आधी सिद्ध केली आहे. या युद्धात गायडेड बॉम्बचा वापर करत पाकिस्तानी सैन्याची बंकर भारतीय सैनीकांनी अचूक टिपली होती. लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता, कमी उंचीवरून उडण्याचे कौशल्य तसेच अनेक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता या विमानांमध्ये असल्याने जगातील  प्रमुख लढाऊ विमानांमध्ये या मिराजची गनना होते.

             मिराज हे सिंगल इंजीन असलेले विमान आहे. त्यात रडास डॉप्लर मल्टी टारगेट हे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून यामुळे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता या विमानात आहे. लांब पल्यांच्या मोहिमांसाठी या विमानांचा वापर केला जाऊ शकतो. १९८५ नंतर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ही विमाने दाखल झाली. कारगील युद्धातली अतिऊंचावरून गायडेड बॉम्ब शत्रुच्या बंकरवर टाकून पाकिस्तानी सैन्याला  भारतीय वैमानिकांनी सळो की पळो करून सोडले होते. २००४ नंतर हवाई दलात या विमानांची स्कॉर्डन आणखी वाढविण्यात आल्या. या विमानांच्या आधूनिकीकरणासाठी २०११ मध्ये जवळपास २.२ बिलीअन डॉलर्सची गुंतवणूक भारत सरकारतर्फे करण्यात  आली. क्षेपणास्त्र तसेच मोठ्या वजनाचे बॉम्ब वाहून नेण्यासाठी ९ पॉर्इंट या विनामाच्या पंखावर बसविली आहेत. जवळपास १७ हजार किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता या विमानामध्ये आहेत. 

Web Title: India attacks on Pakistan by using fighter aircraft after 50 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.