1100 तुळशी राेपांतून साकारला भारत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 08:02 PM2019-07-12T20:02:36+5:302019-07-12T20:05:02+5:30

आषाढी एकादशीचे औचित्य साधून पुण्यातील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी तुळशी राेपांमधून भारताचा नकाशा साकारला.

India's map decorated by 1100 tulsi saplings | 1100 तुळशी राेपांतून साकारला भारत

1100 तुळशी राेपांतून साकारला भारत

Next

पुणे : तब्बल 1100 तुळशीच्या राेपांतून भारताचा नकाशा साकारण्यात आला. आषाढी एकादशी आणि गुरुपाेर्णिमेचे औचित्य साधून तुळशीचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये पाेहचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.  या उपक्रमात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. देशात शांतता, सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, तसेच आपल्याला शुद्ध हवा आणि पवित्र वातावरण मिळावे, या भावनेतून तुळशीच्या रोपांतून भारताचा नकाशा साकारण्यात आला. 

यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते. विद्यार्थी व शिक्षकांनी यावेळी पर्यावरण रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली. ही रोपे सर्व विद्यार्थी व शिक्षकांना वाटण्यात आली.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे, भारतीय सीमांच्या रक्षणासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, आपल्यामध्ये वृक्षारोपण करण्याची भावना निर्माण व्हावी, तसेच मुलांना तुळशीचे महत्त्व समजावे व त्यांना वृक्षांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तुळस ही एक गुणकारी औषधी वनस्पती आहे. गेल्या हजारो वर्षांपासून अनन्य साधारण महत्व असलेल्या तुळशीची पूजा आपण करतो. सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसात दोन वेळा तुळशीला पाणी घालणे आणि दिवे लावण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे.

वर्षा उसगावकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "तुळस ही आपल्यासाठी अतिशय जवळची आहे. आपल्या अंगणात असलेल्या तुळशीमुळे घराचे वातावरण प्रसन्न व शुद्ध राहते. तुळशी औषधी वनस्पती असून, त्याचे अनेक फायदे आहेत. औषंधापासून ऑक्सिजनपर्यंत सर्व गोष्टी देणाऱ्या तुळशीचे रोपण आपण मोठ्या प्रमाणात केले पाहिजे."

Web Title: India's map decorated by 1100 tulsi saplings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.