लसीकरण केंद्रावर लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप, कर्मचारी वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:07+5:302021-03-17T04:10:07+5:30
आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांसह लसीकरण केंद्रांवर कार्यकर्त्यांसह जाऊन फोटो काढण्याची हौस पुरवून घेतात. यादरम्यान ...
आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांसह लसीकरण केंद्रांवर कार्यकर्त्यांसह जाऊन फोटो काढण्याची हौस पुरवून घेतात. यादरम्यान एखादा कार्यकर्ता कुठलीही पूर्व नोंदणी न करता लसीकरण करून द्यावे यासाठी प्रयत्न करताना दिसतात. या सर्व परिस्थिती मुळे लसीकरण केंद्रांवरील कर्मचाऱ्यांवर व यंत्रणेवर ताण पडत आहे. लसीकरण केंद्रांवर पूर्ण सज्जतेने व क्षमतेने लसीकरण देण्याचा शासनाकडून प्रयत्न आहे. तरीदेखील लोकप्रतिनिधींकडून रोज किमान दहा लोकांना तरी कुठलीही पूर्व नोंदणी न करता लसीकरण करून द्यावे, असा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे पूर्व नोंदणी करून येणाऱ्या नागरिकांना लस घेण्यासाठी ताटकळत बसून राहावे लागत आहे.
...............................................................................
फोटो ओळ:- कोविड लसीकरण केंद्रांवर प्रवेश द्वारावर लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांकडून फ्लेक्स लावून जाहिरातबाजी केली जात आहे.