इराणी विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 03:23 AM2017-08-11T03:23:32+5:302017-08-11T03:33:51+5:30
पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकित महाविद्यालयात पीएच.डी.साठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने इराणी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकित महाविद्यालयात पीएच.डी.साठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने इराणी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.
शिवाजी नारायण बोऱ्हाडे (वय ५३, रा. कृष्णानगर, नवी सांगवी) असे अटक केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. ३१ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला इराणची असून, २०१६मध्ये पीएच.डी.चे शिक्षण घेण्यासाठी भारतात आली. पुणे विद्यापीठात अकाऊंट विषयात पीएच.डी.साठी प्रवेश मिळावा म्हणून तिने प्रयत्न केला होता; पण तो मिळाला नाही. पीएच.डी.साठी गाईड शोधत असताना एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचे नाव इराणी मित्राने सुचविले. प्रबंध घेऊन ती गेली असता त्यांनी चुका काढून परत पाठविले. मंगळवारी दुपारी साडेबारा ते दीडच्या सुमारास ती बोºहाडे यांना भेटण्यासाठी गेली. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील रूम नं. १०मध्ये ते एकटेच होते. तिथे गेल्यानंतर प्रवेश देण्यासाठी त्यांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. घाबरलेल्या या महिलेने झालेला प्रकार मित्राला आणि पालकांना कळविला. मोबाईलमध्ये सर्व संभाषण तिने रेकॉर्ड केले आहे. बोºहाडे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.ॉ
माझ्या विषयांतर्गत महाविद्यालयात एकच शिक्षक आणि दोन विद्यार्थी आहेत, असे सांगून ‘मंगळवारी दुपारी माझ्याकडे ये, आपण प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,’ असे बोºहाडे यांनी या महिलेला सांगितले होते. याच वेळी तिचा विनयभंग केला.