तुरळक पावसाने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:46 AM2018-05-15T01:46:11+5:302018-05-15T01:46:11+5:30

महापालिकेच्या वतीने दर वर्षी पावसाळ््यापूर्वी मोठ्या प्रमाणात शहरामध्ये नाले व गटारेसफाईची कामे केली जातात. रविवारी शहरामध्ये झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाच्या तुरळक सरीनेदेखील काही भागांत रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होते.

It is clear from the rainy season that the roads have been cleared for rain | तुरळक पावसाने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप

तुरळक पावसाने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप

Next

पुणे : महापालिकेच्या वतीने दर वर्षी पावसाळ््यापूर्वी मोठ्या प्रमाणात शहरामध्ये नाले व गटारेसफाईची कामे केली जातात. रविवारी शहरामध्ये झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाच्या तुरळक सरीनेदेखील काही भागांत रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होते. सध्या शहरामध्ये सर्व वॉर्ड आॅफिसमार्फत नाले-गटारे सफाईचे काम सुरू आहे. येत्या ३१ मेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत. त्यामुळे यंदा तरी पावसाळ््यापूर्वीच्या कामांनी दिलासा मिळणार का, याकडे पुणेकराचे लक्ष आहे.
महापालिकेच्या हद्दीत सध्या ३५० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे नाले आणि ५०० किलोमीटरहून अधिक लांबीची गटारे आहेत. शहरात अस्तित्वात असलेल्या अनेक ओढ्या-नाल्यावर अतिक्रमण करून नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आला आहे. तसचे दरवर्षी बंदिस्त नाले, गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, माती, पाला-पाचोळा साठल्याने पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. तसेच अनेक भागांत रस्त्यांचे काम करताना चढ-उतार, पावसाचे पाणी जाण्यासाठी काढलेल्या चेंबर्स चुकीच्या ठिकाणी लागल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते.
शहराच्या विविध भागांत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठते, अशी सुमारे १५० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे.
अशा ठिकाणी पावसाळी गटारांचे काम पूर्ण करण्यासाठी महापौरांनी प्रशासनाला ३१ मेपर्यंतची डेडलाईन दिली आहे.
>पावसाळ््यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करा
वॉर्डस्तरीय योजनेतील विकासकामकांना गती द्यावी, ही कामे भाजपाच्या जाहीरनाम्याशी सुसंगत असावीत. पावसाळ्यापूर्वीच्या कामांचे नियोजन करून तातडीने नालेसफाई, सीमाभिंतीची कामे, गाळ काढणे, जलपर्णी काढणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे, अनधिकृतपणे खोदाई केल्यास कारवाई करा, अशा अनेक सूचना भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रभाग समिती अध्यक्ष व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या. या वेळी महापौर मुक्ता टिळक व सभागृहनेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.
आराखड्यातील कामे पूर्ण कधी होणार?
पुणे शहराची स्थिती मुंबईसारखी होऊ नये, यासाठी दोन वर्षांपूर्वी शहरातील पाणी साठण्याची ठिकाणे निश्चित करून ही कामे करण्यासाठी तब्बल ४८२ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये गतवर्षी पहिल्या टप्प्यात तब्बल १५० कोटी रुपयांची १६५ स्थळे निश्चित करून काम करण्यात आले. यामध्ये ९५ टक्के काम पूर्ण झाले. यंदा दुसºया टप्प्यात शहरातील १६७ ठिकाणे निश्चित करून काम सुरू आहे. साफसफाई करणे, पावसाळी लाइन टाकणे, कल्व्हर्टर्स बांधणे आदी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु दोन वर्षांत अद्याप आराखड्यातील कामे पूर्ण झालेली नाहीत.
>नालेसफाईच्या कामांची फेरतपासणी करणार
महापालिकेच्या वतीने दरवर्षी पूर्वी पावसाळी कामे करण्यासाठी प्रत्येक वॉर्डला सरासरी २० लाख रुपयांचा निधी दिला जातो. या निधीतून स्थानिक पातळीवर निविदा काढून नाले-गटारसफाईची कामे केली जातात. यंदादेखील सध्या सर्व वॉर्डमध्ये नाले-गटारेसफाईची कामे सुरू आहेत. ३१ मेपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक व प्रमुख अधिकाºयांसह कामांची पाहणी करून फेरतपासणी करण्यात येणार आहे.
- श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते

Web Title: It is clear from the rainy season that the roads have been cleared for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.