जागरण गोंधळ .. ते पण चक्कं २ वर्षांच्या '' ब्रुनो '' साठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 09:15 PM2019-05-20T21:15:48+5:302019-05-20T21:25:13+5:30

आजपर्यंत एखाद्या कुटुंंबामध्ये लग्न , मुंज यासांरखे मंगलकार्ये घरात पार पडले की जागरण गोंधळ चा विधी करण्याची परंपरा आहे. पण....

Jagaran Gondhal .. It's a 2 year old "Bruno" ... | जागरण गोंधळ .. ते पण चक्कं २ वर्षांच्या '' ब्रुनो '' साठी...

जागरण गोंधळ .. ते पण चक्कं २ वर्षांच्या '' ब्रुनो '' साठी...

Next

धनकवडी : आजपर्यंत एखाद्या कुटुंंबामध्ये लग्न , मुंज यासांरखे मंगलकार्ये घरात पार पडले की जागरण गोंधळ चा विधी करण्याची परंपरा आहे.  वाघ्या, मुरळी , गाणी, गोंधळी कवणे यांच्या माध्यमातून देवदेवतांना आवाहन पूजन करुन हा कार्यक्रम पार पडतो. पण पुण्यातील धनकवडी येथे चक्कं एका कुत्र्यासाठी एका कुटुंबाने जागरण गोंधळाचा कार्यक्रम केल्याचे घटना घडली. कथेच्या माध्यमातून शुभकार्याचे महत्व सांगितले जाते. सध्या हा कुत्र्यासाठी केलेला जागरण गोंधळाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरतो आहे. 
धनकवडी मधील राजमुद्रा सोसायटी मध्ये राहणारे नाना जाधव यांनी असाच जागरण गोंधळ भोर तालुक्यातील आपल्या जांभळी या गावी पाळीव कुत्र्यासाठी घातला आणि त्यांच्या कुत्र्याचे नाव ब्रुनो असून वय 2 वर्षे आहे. रोटविलर  जातीचा हा कुत्रा आहे. 
जाधव यांच्याकडे असलेल्या अशाच जातीच्या दहा महिने वयाच्या कुत्र्याचा गॅस्टोच्या आजाराने मृत्यू झाला.  त्यांच्या मुलींना त्या कुत्र्याचा खूप लळा होता. म्हणून त्यांनी तसाच नवीन कुत्रा घरी आणला. त्याचे नावसुध्दा  ब्रूनो ठेवले. पण दुर्दैवाने नवीन आणलेल्या कुत्र्यालासुध्दा गॅस्ट्रो झाला . या आजारात कुत्र्याला आठ दिवस अन्न पाणी देत नाही. अशा आजारातून तो पूर्णपणे बरा व्हावा म्हणून जाधव यांनी खंडोबा देवाला नवस केला . ब्रूनोला बरे वाटले की ,जागरण गोंधळ घालू आसा हा नवस होता. त्यामुळे जाधव यांनी आपल्या मूळ गावी जांभळी मध्ये जागरण  गोंधळाचे आयोजन केले. प्रसिद्ध गोंधळी अंधू पंकू मंडळीनी हा गोंधळ घातला. जाधव यांनी खंडोबाला केलेला नवस अशाप्रकारे पूर्ण केला.

Web Title: Jagaran Gondhal .. It's a 2 year old "Bruno" ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.