जानाईदेवीचा पालखी सोहळा व निवकणे येथील यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:44+5:302021-03-18T04:10:44+5:30

जेजुरीची ग्रामदैवता असणाऱ्या जानाईदेवीचे मूळस्थान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या निवकणे येथे असून जानाई भक्त नागू माळी यांच्या ...

Janaidevi's Palkhi ceremony and Yatra at Nivkane canceled | जानाईदेवीचा पालखी सोहळा व निवकणे येथील यात्रा रद्द

जानाईदेवीचा पालखी सोहळा व निवकणे येथील यात्रा रद्द

Next

जेजुरीची ग्रामदैवता असणाऱ्या जानाईदेवीचे मूळस्थान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या निवकणे येथे असून जानाई भक्त नागू माळी यांच्या भक्तीमुळे तीनशे वर्षांपूर्वी जानाईदेवी प्रसन्न होऊन जेजुरी येथे आली अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून जेजुरी ते निवकणे अशी पायी पालखी सोहळा अनेक पिढ्यांपासून काढण्यात येतो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे ही यात्रा रद्द झाल्याने भाविक निराश झाले आहे. जेजुरीकर भाविकांनी या यात्रेसाठी निवकणे येथे येऊ नये अशी विनंती ट्रस्टचे अध्यक्ष नागनाथ झगडे, तसेच जानाईदेवी पालखी पदयात्रा अन्नदान सेवा ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी कुतवळ, बारा बलुतेदार विकास संस्थेचे अध्यक्ष सचिन खोमणे, तसेच सेवेकरी दीपक खोमणे,दत्ता खोमणे, माउली खोमणे उमेश गायकवाड,राहुल गोडसे,दादा मुलाणी,शैलेश राउत यांनी केली आहे.जानाई भक्त नागू माळी सेवा ट्रस्टच्या वतीने या यात्रेसाठी परवानगी मिळावी यासाठी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी,तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करून या ठिकाणी तीन दिवस संचार बंदी लागू करण्यात आली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पूर्वीपासून चालत आलेल्या पूजा अर्चा आदी धार्मिक विधी काही मोजक्या मानकरी समवेत होणार आहे.

निवकणे येथील जानाईदेवी

Web Title: Janaidevi's Palkhi ceremony and Yatra at Nivkane canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.