जेईई परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा शरद भट देशात ३१ वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 09:36 PM2018-04-30T21:36:49+5:302018-04-30T21:36:49+5:30

जेईई मेन्सची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांचा ३६० गुणांची परीक्षा ८ एप्रिल रोजी घेण्यात आली होती.

JEE Exam results declared, punes sharad bhat 31st in country | जेईई परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा शरद भट देशात ३१ वा

जेईई परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा शरद भट देशात ३१ वा

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रातून दिड लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सची परीक्षा दिलीगेल्या १६ वर्षात जेईई निकालाचा कटआॅफ पहिल्यांदाच इतका खाली घसरला

पुणे : सीबीएसईकडून इंजिनीअरिंग कॉलेजांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन्स परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच जेईईचा कटआॅफ खूप घसरल्याचे दिसून येत आहे. या परीक्षेत पुण्याचा शरद भट देशात ३१ वा तर अर्णव दातार ४१ वा आला. 
जेईई मेन्सची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांचा ३६० गुणांची परीक्षा ८ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेचा कटआॅफ सर्वसाधारण गटासाठी ७४, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) ४५, अनुसूचित जाती (एससी) २९, अनुसूचित जमाती (एसटी)२४  असा घसरला आहे. जेईई मेन्सचे तिन्ही पेपर खूपच अवघड काढण्यात आले असल्याने हा कट आॅफ खाली आहे. 
जेईई मेन्स परीक्षेसाठी देशभरातून १० लाख ४६ हजार विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २ लाख २४ हजार विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत पुण्यातील शरद भट ३१ वा, अर्णव दातार ४१ वा, अनुज श्रीवास्तव या विद्यार्थ्यांने ६६ वा, चिन्मय भारती या विद्यार्थ्याने १९७ वा रँक प्राप्त केला आहे.    
परीक्षेच्या निकालाबाबत जेईई परीक्षांचे मार्गदर्शक दुर्वेश मंगेशकर यांनी सांगितले,‘‘जेईईच्या रसायनशास्त्र, गणित हे दोन पेपर खूपच अवघड काढण्यात आले होते. त्यातील प्रश्न दिलेल्या ३ तासांच्या वेळेत सोडविणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पेपर पूर्ण सोडविता आला नव्हता. त्यामुळे गेल्या १६ वर्षात जेईई निकालाचा कटआॅफ पहिल्यांदाच इतका खाली घसरला आहे.’’
महाराष्ट्रातून दिड लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सची परीक्षा दिली होती, त्यापैकी ३० हजार विद्यार्थी हे पुण्यातील होते. त्यापैकी १ हजार विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश आले आहे. या परीक्षेचे पेपर खूप टफ काढण्यात आल्याने २९ हजार विद्यार्थ्यांना यामध्ये अपयश आले. 

सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे
जेईई मेन्स परीक्षेमध्ये पुण्याचा अर्णव दातार देशात ४१ वा आला आहे. त्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे असल्याचे त्याने सांगितले. त्याचे वडील कॉग्नीझंट कंपनीत नोकरीला आहेत तर आई टाटा रिसर्च इन्टिटयूटमध्ये कार्यरत आहे. परीक्षेच्या तयारीसाठी त्याने दिवसातून ६ ते ७ तास अभ्यास केला. तो अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याचे हायस्कूलचे शिक्षण बिशप स्कूलमधून झाले आहे.

जेईई निकालाचा कट आॅफ घसरला
          कट आॅफचा तक्ता
वर्ष    खुला गट  ओबीसी  एससी   एसटी
२०१३    ११३          ७०      ५०    ४५
२०१४    ११५           ७४       ५३    ४७
२०१५    १०५           ७०       ५०    ४४
२०१६    १००            ७०  ५२    ४८
२०१७    ८१            ४९    ३२    २७
२०१८    ७४           ४५         २९    २४

अर्णव दातार 

Web Title: JEE Exam results declared, punes sharad bhat 31st in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.