ऐंशीच्या उंबरठ्यावरील ज्येष्ठ मातेकडून दागिने समर्पित; पुण्यातील ताराचंद रुग्णालयाला ८ लाखांची देणगी
By राजू इनामदार | Published: May 23, 2023 05:22 PM2023-05-23T17:22:16+5:302023-05-23T17:23:15+5:30
ज्येष्ठ मातेच्या चेहऱ्यावर फार मोठे काम करत असल्याचा आविर्भाव नव्हता, तर सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचे समाधान दिसत होते
पुणे: विंदा.करंदीकरांच्या या कवितेची अनुभूती आली की हात आपोआपच जोडले जातात. लीला देडगे या, ऐंशीच्या उंबरठ्यावरील एका ज्येष्ठ मातेने नुकताच असा अनूभव दिला. आयुष्याच्या उत्तरार्धात, पतीच्या पश्चात, मुलाबाळांची कर्तव्ये पार पाडून, लीलाताईंनी स्वतःचे दागदागिने समाजॠण जाणून समर्पित केले. पुण्यातील ताराचंद रुग्णालयाला, डायलिसीस मशीन साठी त्यांनी यातून ८ लाख५० हजार रूपयांची देणगी दिली. या घटनेचे साक्षीदार असलेले सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांनी ही माहिती दिली.
ताराचंद धर्मादाय रुग्णालय सेवाभावनेचा आंणि पारदर्शकतेसाठी प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळक आंणि तत्कालीन समाजधुरीणांच्या प्रेरणेने सन १९२६ मध्ये रुग्णालयाची मुहूर्तमेढ झाली. उपेक्षित आंणि वंचित घटकांना प्राधान्याने नाममात्र दरांत सेवा देणे, हेच कायमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे लीलाताई देडगे यांनी रूग्णालयाला मदत करण्याचा निर्णय घेतला. इतका मोठा निर्णय घेताना, तो प्रत्यक्षात आणताना लीलाताईंच्या चेहऱ्यावर कसलेही फार मोठे काम करत असल्याचा आविर्भाव नव्हता, तर सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचे समाधान दिसत होते. हॉस्पिटल व्यवस्थापनाने या देणगीचा स्विकार करत लीलाताईंना अपेक्षित आहे, त्याप्रमाणेच रूग्णालयाची वाटचाल राहील असा विश्वास दिला.