निराधार योजनेमुळे खऱ्या लाभार्थ्यांना न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:31+5:302021-08-23T04:13:31+5:30
इंदापूर : राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाचे मिळणारे अनुदान सातत्याने मिळाले पाहिजे. यासाठी माझा पाठपुरावा सातत्याने असतो. ...
इंदापूर : राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाचे मिळणारे अनुदान सातत्याने मिळाले पाहिजे. यासाठी माझा पाठपुरावा सातत्याने असतो. इंदापूर तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळतो आहे. त्यामुळे आगामी काळात लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
इंदापूर शहरातील शहा संस्कृतिक भवन येथे शनिवार (दि.२१) रोजी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे सागर मिसाळ, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील उपस्थित होते.
निराधार, परितक्त्या तसेच संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्यांना शासनाकडून अनुदान मिळत असते. त्यांची उपजीविका खऱ्या अर्थाने या अनुदानावर चालते. त्यामुळे राज्य सरकार अशा लाभार्थ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असाही विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, कोणत्याही गावातील लाभार्थी अशा छोट्या-मोठ्या योजनेतून वंचित राहणार नाही. त्यासाठी अधिकची मेहनत घेणारी यंत्रणा संजय गांधी निराधार योजनेमध्ये काम करते आहे.
२२ इंदापूर
लाभार्थ्यांना प्रमाणपत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.